Homeताज्या बातम्यामनोरंजन

या अभिनेत्रीला डेट करतोय कार्तिक आर्यन?

बॉलिवूडचा हँडसम हंक कार्तिक आर्यन त्या अभिनेत्यांपैकी एक आहे ज्याच्यावर लाखो तरुणी फिदा आहेत. कार्तिक आर्यन त्याच्या प्रोफेशनल लाईफसोबतच त्याच्या

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत 82 हजार 435 शेतकर्‍यांना मिळणार लाभ
संप मिटेपर्यंत एसटीचे मेकॅनिक-नियंत्रक होणार चालक-वाहक
मेधा पाटकर यांच्या विरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

बॉलिवूडचा हँडसम हंक कार्तिक आर्यन त्या अभिनेत्यांपैकी एक आहे ज्याच्यावर लाखो तरुणी फिदा आहेत. कार्तिक आर्यन त्याच्या प्रोफेशनल लाईफसोबतच त्याच्या पर्सनल लाईफमुळे नेहमी चर्चेत असतो. कार्तिकचे नाव त्याच्यासोबत चित्रपटामध्ये काम केलेल्या अभिनेत्रींसोबत अनेकदा जोडले जाते. अनन्या पांडे असो की जान्हवी कपूर. क्रिती सेनॉननंतर त्याचे नाव सारा अली खानसोबत जोडले गेले होते. सारासोबतची डेटिंग आणि नंतर ब्रेकअपच्या बातम्यानंतर आता कार्तिक आर्यन एका नव्या अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. कार्तिक आर्यन आणि तारा सुतारिया यांच्या डेटिंगच्या अफवांना रात्री वेग आला जेव्हा ते डिनर डेटनंतर एकत्र दिसले. मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करून दोघेही बाहेर आले आणि आपापल्या कारमध्ये बसण्यापूर्वी दोघांनी एकमेकांना मिठी मारली. पापाराझींच्या कॅमेऱ्यामध्ये हे कपल कैद झाले. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यावर नेटिझन्स देखील भरभरून कमेंट्स करत आहेत. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रेस्टॉरंटबाहेर येताच कार्तिक आर्यन आणि तारा सुतारिया यांना पापाराझींनी घेरलं. कॅमेऱ्यांना पाहून ताराने पळ काढण्याचा प्रयत्न केला.

आपल्या कारमध्ये बसण्यापूर्वी ताराने कार्तिकला मिठी मारली. त्यानंतर कार्तिकने ताराला तिच्या कारमध्ये बसवले आणि तो तिथून निघून गेला. आता या कपलचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्स त्यावर अनेक प्रकारच्या कमेंट करत आहेत.व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, कार्तिक आर्यनने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पँट परिधान केली आहे. या ड्रेसिंगमध्ये तो खूपच हँडसम दिसत आहे. तर ताराने काळ्या रंगाचा टॉप आणि लेपर्ड प्रिंट स्कर्ट घातला आहे. या ड्रेसमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. खरं तर, कार्तिक आणि तारा हे दोघेही ‘आशिकी 3’ या चित्रपटात एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. कार्तिक आणि तारा हे दोघेही एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. दरम्यान, ‘आशिकी 3’चे शूटिंग जानेवारी 2024 च्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. अनुराग बासू या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. कार्तिक आर्यनने नुकताच ‘चंदू चॅम्पियन’चे शूटिंग पूर्ण केले आहे.

COMMENTS