Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पिंपरी चिंचवड महापालिका मालमत्ता सर्वेक्षणातील अनियमितता; चौकशीअंती देयक देणार : उद्योगमंत्री उदय सामंत

नागपूर दि. १० :- पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यासाठी नेमण्यात आलेल्या स्थापत्य  कन्सल्टन्सी इंडिया प्रायव

राज्यातील प्रकल्पांचे भूसंपादन ठरलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करा : मुख्यमंत्री फडणवीस
नव्या पिढीच्या शिक्षकांनी हा पेशा जपावा: प्रा. मकरंद खेर
मांजरी माथा व वाघदरी हे गाव विकासापासून कोसोदूर

नागपूर दि. १० :- पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यासाठी नेमण्यात आलेल्या स्थापत्य  कन्सल्टन्सी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने केलेल्या कामातील अनियमिततेची चौकशी करूनच कंपनीस उर्वरित देयक दिले जाईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.

सदस्य अमित गोरखे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत स्थापत्य कन्सल्टंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या खासगी ठेकेदाराकडून शहरातील सर्व मालमत्ताचे सर्वेक्षण  या संदर्भात उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या उत्तरात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली.  या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य उमाताई खापरे यांनी उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.

मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले, ५ लाख ८० हजार मालमत्तेच्या सर्वेक्षणासाठी कंपनीस ४७ कोटी ९५ लाखाचे काम देण्यात आले. तथापि ३ लाख ७० हजार २१३ इतक्या नवीन मालमत्ता आढळून आल्या.  त्यासाठी २९ कोटी ९ लाख ८७ हजार ४१८ इतक्या वाढीव खर्चास महापालिकेने मान्यता दिली. यामधील केवळ १२ कोटी रुपये कंपनीस अदा करण्यात आले आहे. सर्वेक्षणादरम्यान काही मालमत्तांचा प्रकार रेसिडेन्शिअल वरून कमर्शियल असा बदल करण्यात आल्याचे आढळले.  या बदलांमधील काही अनियमितताबाबत सध्या आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांमार्फत  चौकशी करून संबंधित कंपनीला उर्वरित देयक अदा केले जाईल,  असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.

COMMENTS