Homeताज्या बातम्याविदेश

इराणच्या राष्ट्रपतींचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

परराष्ट्र मंत्र्यांसह 9 जणांचा मृत्यू ; तब्बल 17 तासांनंतर सापडले अवशेष

तेहराण ः इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्री होसेन यांचा हेलिकॉप्टर अपघातात रविवारी मृत्यू झाला आहे. दुर्घटनाग्रस्त झा

दीडशे रूपये कमावले आणि साडे सतरा लाख गमावले
माण तालुक्यात सिलेंडरचा स्फोट; संसारोपयोगी साहित्य जळून खाक
सावकाराच्या जाचास कंटाळून केली आत्महत्या | DAINIK LOKMNTHAN

तेहराण ः इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्री होसेन यांचा हेलिकॉप्टर अपघातात रविवारी मृत्यू झाला आहे. दुर्घटनाग्रस्त झालेल्या हेलिकॉप्टरचे अवशेष डोंगराळ भागात सापडले असून ते पूर्णतः जळून खाक झाले आहे. तर हेलिकॉप्टरच्या अपघातस्थळी कोणीही वाचलेले सापडलेले नसल्याचे समोर आले आहे. हेलिकॉप्टरमध्ये राष्ट्रपतींसह 9 जणांच समावेश होता. तब्बल 17 तासानंतर सोमवारी सकाळी बचावपथकाला त्यांचे अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले. मात्र, अपघातस्थळी जीविताची कोणतीही चिन्हे आढळली नसल्याचे समोर आले आहे. इराणच्या रेड क्रिसेंटचे प्रमुख पिरहुसेन कोलिवंद यांनी देखील या अपघातातून कुणी बचावले असेल याची शक्यता कमी असल्याचे म्हटले आहे. इराणची राजधानी तेहरानपासून वायव्येला 600 किलोमीटर अंतरावर असलेल्या अझरबैजान देशाच्या सीमेवरील जोल्फा या शहराजवळ इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रईसी शेजारी राष्ट्र अझरबैजान येथून एका धरणाचे उद्घाटन करून परत येत होते.

राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये इराणचे परराष्ट्र मंत्री हुसेन अमीर अब्दुल्लाहियान, पूर्व अझरबैजान प्रांताचे गव्हर्नर मलेक रहमती, तबरीझची शुक्रवारची नमाज इमाम मोहम्मद अली अलेहाशेम, वैमानिक, सहपायलट, क्रू चीफ, सुरक्षा प्रमुख, आणि आणखी एक अंगरक्षक होते. मुसळधार पाऊस, धुके आणि वार्‍यामुळे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. यामुळे या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने वैमानिकाला ’हार्ड लँडिंग’ करावे लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. रविवारी या दुर्घटनेच्या वृत्तानंतर इराणच्या लष्कराच्या चीफ ऑफ स्टाफने सर्व लष्कर आणि रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या बचाव पथकाने शोध आणि बचाव कार्य राबवले. सोमवारी पहाटे सोशल मीडियावर अनेक दृश्यांमध्ये चमकदार जॅकेट आणि डोक्याची टॉर्च परिधान केलेले बचाव पथक जीपीएस डिव्हाइसच्या साह्याने बर्फवृष्टीत पायी चालत अपघातस्थळाचा शोध घेतांना दिसत होते. दरम्यान या हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर इराणचे परराष्ट्र धोरण आणि इराणच्या आण्विक कार्यक्रमावर कोणताही परिमाण होणार नाही असे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी स्पष्ट केले. अनेक जागतिक नेत्यांनी हेलिकॉप्टर दुर्घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आणि बचावकार्यात मदत करण्याची तयारी दर्शविली. इराक, कुवेत, कतार, सौदी अरेबिया, सीरिया, रशिया, तुर्कस्तान आणि युरोपियन युनियन या देशांनी मदतीचा हात पुढे केला. शोध कार्यात मदत करण्यासाठी युरोपियन युनियनने आपली जलद प्रतिसाद मॅपिंग सेवा देखील सक्रिय केली होती.

अमेरिकेने केला घातपाताचा संशय व्यक्त – इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या हेलिकॉप्टर अपघातावरून अमेरिकेतही खळबळ उडाली आहे. जो बायडन यांनी तातडीची बैठक बोलावली. या अपघातावर अमेरिकन खासदार चक शूमर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अपघातामागे काही षडयंत्र असू शकते, असे आत्ताच म्हणता येणार नाही. मात्र, असा कोणताही पुरावा अद्याप सापडलेला नाही. ते म्हणाले की, इराणमध्ये ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर कोसळले त्या ठिकाणचे हवामान खूपच खराब होते. त्यामुळे प्रथमदर्शनी हा अपघात असल्याचे दिसत असले तरी अपघातामागे घातपाताची शंका नाकारता येत नाही, असेही अमेरिकेने म्हटले आहे.

COMMENTS