जालना : मराठा आरक्षणासाठी लढा तीव्र करणारे मनोज जरांगे यांची अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून चौकशी करण्याची मागणी ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे
जालना : मराठा आरक्षणासाठी लढा तीव्र करणारे मनोज जरांगे यांची अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून चौकशी करण्याची मागणी ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे. एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे गेल्या पाच दिवसांपासून जालन्यातील अंतरवाली सराटीत पुन्हा उपोषणाला बसले आहेत. तर तिथून काही अंतरावरच ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे ओबीसी बचाव आरक्षणासाठी उपोषण करत आहे. शनिवारी नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
वाघमारे म्हणाले की, मनोज जरांगेच्या आंदोलनामधून दहशत माजवण्याचे काम आणि ओबीसींवर दबाव टाकण्याचा काम सुरू आहे. मनोज जरांगे यांनी अभ्यास करावा. रात्री येऊन जर मंत्री भेटत असतील तर त्यांचे काम काय आहे? रात्रीच खेळ चाले… रात्रीत बंद दाराआड काय चालते? शंभर खोक्यांचा अपहार झाल्याचे त्यांनी मान्य केले आहे, याबाबत राज्य सरकारने चौकशी केली पाहिजे अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारला विनंती आहे की, जरांगे यांची ईडीमार्फत चौकशी झाली पाहिजे. आमच्या मागे कोण शासकीय आहे आम्ही वारंवार सांगतो जरांगे यांच्या मागे मुख्यमंत्री आणि तुतारीवाल्याचा हात आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. मुख्यमंत्र्यांना कुठलाच अभ्यास नाही. मुख्यमंत्र्यांनी जे जीआर काढले ते कोर्टात टिकले पाहिजे ना. तुतारीच्या पक्षामध्ये मी स्वतः होतो, पवार साहेबांना घरातच सगळे पद लागत असतात. मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असताना जाणवले की, लोकप्रतिनिधींनी कारखान्याहून अंतरवलीत वायर पुरवले. जरांगे यांचे उपोषण उठल्यानंतर बसवण्याचे काम या लोकप्रतिनिधी आणि रोहित पवार यांनी केले असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
COMMENTS