Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नालंदा स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

अहमदनगर - माणसाचे जीवन हे अस्थिर होत चाललेले आहे. धकाधकीच्या  जीवनात ताण-तणावामुळे आरोग्यावर परिणाम होतो. या सर्वांवर योगासनामुळे मात करू शकतो.

जवळा ग्राम सचिवालयासाठी 25 लाखाचा निधी मंजूर
नवीन खेळाडूंना चालना देण्याकरिता चेस इन स्कूल हा उपक्रम शहरात राबविणार -नरेंद्र फिरोदिया
LokNews24 l सार्व. बांधकाम विभागातील उत्तर मुंबई विभागाला बदनाम करणारे ते झारीतील शुक्राचार्य कोण?

अहमदनगर – माणसाचे जीवन हे अस्थिर होत चाललेले आहे. धकाधकीच्या  जीवनात ताण-तणावामुळे आरोग्यावर परिणाम होतो. या सर्वांवर योगासनामुळे मात करू शकतो. भारताने योग ही जगाला दिलेली एक देणगी आहे, म्हणूनच जगभरामध्ये जागतिक म्हणजेच 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. असे प्रतिपादन विद्यालयाच्या डायरेक्टर पल्लवी बहादुर्गै यांनी केले.  वाळुंज येथील नालंदा स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी डायरेक्टर .पल्लवी बहादुर्गै, विद्यालयाच्या प्राचार्या हैदर डिसूजा, योगशिक्षक सागर पवार आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

पुढे बोलताना बहादुर्गै म्हणाल्या की आंतरराष्ट्रीय योगा दिवस विविध विद्यालयात विविध ठिकाणी सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला . नालंदा विद्यालयामध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनीही योगाचा आनंद घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते नालंदा मध्ये शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची ही काळजी घेतली जाते शरीर सुदृढ राहण्यासाठी विद्यालयामध्ये नेहमीच योगाचे धडे हे दिले जातात. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध खेळाच्या माध्यमातून नालंदाचे विद्यार्थी हे चमकले आहेत. शिक्षणाबरोबर खेळ ही तितकाच महत्त्वाचा आहे दोन्हीही एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यामुळे दोन्ही क्षेत्रात नालंदाचे विद्यार्थी अग्रेसर आहेत त्यामुळे विद्यालयाचा निकाल नेहमी 100% लागत असल्याचे  त्या म्हणाल्या . सागर पवार यांनी योग व योगाचे महत्त्व  मुलांना सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली  योगा दिवस करण्यात आला. इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता.

COMMENTS