Homeताज्या बातम्यासंपादकीय

एका ओबीसी नेत्याचा आंतरराष्ट्रीय सन्मान !

भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय विमानतळ त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेखाल झाले. या उद्घाटनानंतर राज्याचे मुख्यमंत्री पंतप

आधार-पॅनकार्ड लिंक करण्यास मुदतवाढ
सरकारला किंमत मोजावी लागेल
लातूर जिल्ह्यात 19 हजार बालके विविध आजारांनी ग्रस्त

भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय विमानतळ त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेखाल झाले. या उद्घाटनानंतर राज्याचे मुख्यमंत्री पंतप्रधान यांच्यासमोरच बोलताना म्हटले की, आता चौथी मुंबई याच परिसरात उभारली जाईल. अर्थात, विकासाच्या टप्प्यावर महानगरी विकसित होत असताना, त्या महानगरांमध्ये वाढणारी लोकसंख्या ही वेगवेगळ्या प्रदेशातून येत असली तरी, त्या एकूणच व्यवस्थेवर अधिक लोकसंख्येचा जो ताण निर्माण होतो; त्यावर अद्यापही नियोजन मात्र कोणत्याही व्यवस्थेला सापडलेले दिसत नाही. असो. याच विमानतळाला जे भारतातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल त्याला दिवंगत दि बा पाटील यांचे नाव नाव दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी याच सभेमध्ये जाहीर केले. अर्थात, यापूर्वी दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमिपुत्रांचे आंदोलन मोठ्या प्रमाणात झालं होतं. दि बा पाटील यांचे केवळ कोकण आणि रायगड विभागातच या क्षेत्रातच कार्य नाही; तर, संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी आपलं कार्य केलेले आहे. केवळ जनतेच्या पाठिंब्यावर महाराष्ट्र सरकारला नमतं घ्यायला लावणारा हा नेता कोण होता, तर शेतकरी कुटुंबातला मुलगा. १३ जानेवारी १९२६ रोजी जन्म झालेल्या दिबांनी स्वातंत्र्य संग्रामातही सहभाग नोंदवला होता. तरुण असताना ते १९४६ च्या चळवळीत सहभागी झाले होते. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन असेल, त्यामध्ये देखील त्यांनी तुरुंगवास भोगलेला आहे. मंडल आयोगाची लढाई असेल, त्यामध्ये देखील त्यांनी हिरीरीने भाग घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मंडल आयोगाचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये ते अग्रेसर राहिले. त्याचबरोबर कोकण आणि रायगड विभाग विभागाचे राजकीय प्रतिनिधित्व करताना त्यांनी आपल्या ओबीसी समुदायाचे प्रतिनिधित्व करताना अतिशय आक्रमक आणि तेवढेच हक्कांचं हे प्रतिनिधित्व केलं. शेतकरी कामगार पक्षामध्ये असताना त्यांनी सातत्याने निवडणुका लढवून त्या जिंकल्या आणि कधी पराभूत झाले नाही. परंतु, पक्षाच्या दृष्टीने शेवटच्या काळामध्ये त्यांची काही कुचंबना झाली असेल; त्यामुळे, त्यांनी पक्ष बदलला आणि शेवटी ते शिवसेनेत जेव्हा दाखल झाले, शिवसेनेने एक प्रकारे त्यांच्याशी दगाबाजीच केली; असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे, दि बा पाटील यांनी शिवसेनेकडून शेवटची उमेदवारी केली आणि ते पराभूत झाले.  त्यानंतर ते राजकारणापासून दूर होत गेले. मात्र, या दरम्यान त्यांनी लोकलढा सुरू ठेवला. आज, नवी मुंबईची जडणघडण सिडकोच्या माध्यमातून होते आहे. या सिडको ने भूमिपुत्रांच्या सगळ्या जमिनी हडप केल्या होत्या. त्या विरोधात त्यांनी आंदोलन केलं आणि साडेबारा टक्क्यांची वानगी त्यांनी आपल्या पदरात पाडून घेतली. मात्र, ही बाब सहजासहजी मिळाली नाही. यासाठी त्यांना आंदोलन करावे लागलं.  या आंदोलनात पाच कार्यकर्त्यांना हौतात्म्य  पत्करावे  लागलं. कारण, तत्कालीन सरकारने त्यांच्यावर थेट गोळ्या झाडल्या आणि छातीवर गोळ्या घेणाऱ्या या शहिदांमुळे मात्र हा लढा यशस्वी झाला. अशा या संघर्षशील नायकाचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याचा अनुषंगाने निश्चितपणे स्वाभिमान वाटतो.  त्याचबरोबर एका ओबीसी नावाचं आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणार हे समीकरण, निश्चितपणे ओबीसी चळवळीला एक ठाम अधिष्ठान देणारा आणि तितकाच आत्मभान आणि आत्मसन्मान देणारं आहे. अशी आमची या निमित्ताने भूमिका आहे. मात्र हे विमानतळ सुरू होण्यापूर्वीच या नावाचा वाद रंगला होता. या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी होती. अखेर आज लोकनेते दी. बा.पाटील अंतरराष्ट्रीय विमानतळ अश्या नावाचा नामफकल लावण्यात आला आहे , राज्य सरकारने या नावाला हिरवा कंदील दिला असला तरी केंद्राची परवानगी मिळणं अजून बाकी आहे. मात्र ही परवानगी मिळणे अवघड नाही. कारण, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच दि वा पाटील यांचे नाव मोठ्या अभिमानाने घेतलं.

COMMENTS