Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वीज चोरांविरुध्द कडक मोहीम राबविण्याचे निर्देश

पुणे / प्रतिनिधी : गेल्या सहा महिन्यांत महावितरण पुणे प्रादेशिक विभागात वीज चोरीची 5719 प्रकरणे व अनधिकृत वीज वापराची 1591 प्रकरणे उघडकीस आली आहेत.एप

वारणा नदी काठी आढळली 6 फुटांची मगर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
जनतेचा निर्णय मान्य; यापुढील आयुष्य जनतेच्या सेवेसाठी : निशिकांत पाटील
बहे घटनेतील जखमी सचिन पाटील यांचा मृत्यू

पुणे / प्रतिनिधी : गेल्या सहा महिन्यांत महावितरण पुणे प्रादेशिक विभागात वीज चोरीची 5719 प्रकरणे व अनधिकृत वीज वापराची 1591 प्रकरणे उघडकीस आली आहेत.
एप्रिल ते ऑक्टोंबर 2022 या कालावधीत वीज चोरी विरुध्द कडक मोहीम राबविण्यात आलेली असून 47 हजार 563 वीज जोडण्यांची तपासणी करण्यात आली आहे. यात 16 कोटी 7 लाख रुपयांची एकूण 5719 वीज चोरीची प्रकरणे उघडकीस आली तर 6 कोटी 43 लाख रुपयांची 1591 अनधिकृत वीज वापराची प्रकरणे उघडकीस आली आहेत. प्राप्त माहितीनुसार वीज चोरीच्या 2463 प्रकरणात 8 कोटी 93 लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. अनधिकृत वीज वापराच्या 524 प्रकरणात 1 कोटी 90 लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
पुणे परिमंडळात एकूण 11 हजार 636 वीज जोडण्या तपासल्या. यात अनधिकृत वीज वापराची 952 प्रकरणे व वीज चोरीची 1502 प्रकरणे उघडकीस आली. बारामती परिमंडळात एकूण 12 हजार 689 वीज जोडण्या तपासल्या तेंव्हा यात अनधिकृत वीज वापराची 243 प्रकरणे व वीजचोरीची 3029 प्रकरणे उघडकीस आली. कोल्हापूर परिमंडळात एकूण 23 हजार 238 वीज जोडण्या तपासण्यात आल्या. यात अनधिकृत वीज वापराची 396 प्रकरणे व वीज चोरीची 1188 प्रकरणे उघडकीस आली आहेत.
आता यापुढे वीज चोरीविरुध्द मोहीम अधिक तीव्र करण्याचे निर्देश पुणे प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिले असून वीज चोरी करणार्‍याचे धाबे दणाणले आहेत. विद्युत अधिनियम 2003 च्या कलम 135 व 136 नुसार वीज चोरी हा दंडनीय अपराध असून यात आरोपींना 3 वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे ग्राहकांनी वीज चोरीपासून परावृत्त व्हावे, असे महावितरणने आवाहन केले आहे.

COMMENTS