Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाथर्डीत महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ निर्दशने

पाथर्डी ः सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ सकल हिंदू बांधवासह संत महंताच्या वतीने महाराजांच्या विरोधात खोटी निदर्शने केली जात

करंजी परिसराला वादळी वार्‍यांसह गारांचा फटका
श्री साई संस्थानच्या 598 कामगारांच्या प्रश्‍नांना प्राधान्य द्यावे
अ‍ॅड. शिंदे आणि डॉ. मंचरकर यांचा वैचारिक वारसा जपला पाहिजे

पाथर्डी ः सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ सकल हिंदू बांधवासह संत महंताच्या वतीने महाराजांच्या विरोधात खोटी निदर्शने केली जात असून पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल करून घेऊ नये यासंबंधी पाथर्डीचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना तारकेश्‍वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री, गोविंद महाराज जाळदेवळेकर, मोहन महाराज सुडके, दीपक महाराज काळे, घनश्याम महाराज शिंदे, गोसेवक सोमनाथ बंग, नितीन तुपे, विश्‍व हिंदू परिषदेचे प्रताप तांदळे, तालुका संघचालक अरविंद पारगावकर, मुकुंद गर्जे, सचिन देशपांडे यांच्यासह हिंदू बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रामगिरी महाराज यांनी केलेल्या विधानांचा विपरीत अर्थ काढला गेलेला आहे. झुंडशाहीद्वारे पोलिसांवर दबाव टाकण्यासाठी खोटी निदर्शने केली जात आहे. महंत रामगिरी महाराज यांनी जे काही वक्तव्य केले आहे त्या वक्तव्याला अनुसरून पुरावे आहेत. महाराजांनी कुठल्याही प्रकारे दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे वक्तव्य केलेले नाही. विनाकारण एक गट मोठ्या संख्येमध्ये पोलीस स्टेशन भोवती गोळा होत आहेत आणि त्याद्वारे पोलीस यंत्रणेवर दबाव टाकून गुन्हा नोंदविण्यासाठी पोलिसांना प्रवृत्त करत आहेत. अशा दबावाला पोलीस दलाने बळी पडू नये व खोटे गुन्हे दाखल करू नये असे निवेदनाच्या शेवटी म्हटले आहे.

COMMENTS