समान नागरी कायद्यासाठी केंद्राला निर्देश द्या

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समान नागरी कायद्यासाठी केंद्राला निर्देश द्या

कुलगुरू फिरोज बख्त अहमद यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका

नवी दिल्ली/प्रतिनिधी : समान नागरी कायद्याचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अलाहाबाद न्यायालयानंतर आता मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठाचे

वातावरणाच्या बदलामुळे दुध उत्पादनात घट
अखेर संजय राऊत यांना अटक; पत्राचाळ घोटाळयात ईडीची कारवाई
सारसनगरला बंद घर फोडले, दागिन्यांची चोरी

नवी दिल्ली/प्रतिनिधी : समान नागरी कायद्याचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अलाहाबाद न्यायालयानंतर आता मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठाचे कुलगुरू फिरोज बख्त अहमद यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी, प्रभावी नियम, कायदे आणि मार्गदर्शक तत्वे तयार करण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. यावेळी त्यांनी समान नागरी करायदा लागू करण्यासाठी केंद्र सरकारला निर्देश द्या अशी मागणी याचिकेतून केली आहे.
याचिकाकर्ते फिरोज बख्त हे देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या मोठ्या भावाचे नातू असून, त्यांनी केंद्राला तीन महिन्यांत समान नागरी संहिता तयार करण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
यावेळी बोलतांना बख्त म्हणाले की, केंद्राने बंधुता, एकता, राष्ट्रीय एकात्मता याशिवाय लैंगिक न्याय आणि लैंगिक समानता यांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्व धर्म आणि संप्रदायांच्या सर्वोत्तम पद्धती आणि विकसित देशांचे नागरी कायदे लक्षात घेऊन भारतीय राज्यघटनेच्या भावनेनुसार समान नागरी कायद्याचा मसुदा तीन महिन्यांच्या आत तयार करावा. भारत विश्‍वगुरू होण्याच्या मार्गावर आहे आणि वेळोवेळी, वैयक्तिक कायद्यांमुळे राज्यघटनेच्या सामान्य कामकाजात खूप हस्तक्षेप केला जातो ज्यामुळे देश चालवण्यास अडथळा येत आहे. यासाठी त्यांनी समान नागरी कायद्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित केली. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून, विधी आयोगाचा अहवाल आल्यानंतर संबंधितांशी सल्लामसलत केल्यानंतर ते समान नागरी कायद्याच्या मुद्द्याचे परीक्षण करेल आणि ही बाब महत्त्वाची आणि संवेदनशील आहे आणि त्यासाठी देशातील विविध समुदायांच्या वैयक्तिक कायद्यांचा सखोल अभ्यास आवश्यक आहे, असे म्हटले होते. यापूर्वी सप्टेंबर 2019 मध्ये, एका खटल्याची सुनावणी करताना, सर्वोच्च न्यायालयाने ‘समान नागरी कायदा’ लागू करण्याच्या बाबतीत गोव्याचे उत्तम उदाहरण म्हणून वर्णन केले होते. दरम्यान, केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात, सध्या समान नागरी संहिता लागू करण्याची कोणतीही योजना नाही असे म्हटले होते. केंद्राने सांगितले की, समान नागरी कायद्याची अंमलबजावणी राज्यघटनेच्या धोरणाच्या निर्देशक तत्त्वांमध्ये नमूद आहे. सार्वजनिक धोरणाशी संबंधित हा मुद्दा असून त्यावर न्यायालयाकडून कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे जारी करता येणार नाहीत. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालय समान नागरी कायदा अस्तित्वात येण्यासाठी केंद्र सरकारला निर्देश देईल की, नाही, हे या सुनावणीतून स्पष्ट होईल.

समान नागरी कायद्याने काय मिळणार ?
समान नागरी कायद्याचे कलम 44 मध्ये स्पष्ट केले असून, ते मार्गदर्शक तत्वांमध्ये उपलब्ध आहे. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर देशाचा आर्थिक, सामाजिक बाबी लक्षात घेता काही बाबी त्वरित लागू करणे शक्यत नव्हते. त्यामुळे समान नागरी कायद्याचे कलम मार्गदर्शक तत्वांमध्ये नमूद केले आहे. हा कायदा करण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. समान नागरी कायदा म्हणजे भारतात राहणार्‍या प्रत्येक नागरिकासाठी, धर्म किंवा जातीचा विचार न करता समान कायदा असणे. समान नागरी कायद्यात, मालमत्तेच्या विभाजनासह विवाह, घटस्फोट आणि दत्तक घेणे या सर्व धर्मांना समान कायदा लागू होईल. समान नागरी कायदा लागू झाल्यानंतर प्रत्येक धर्मासाठी समान कायदा असेल. ज्याप्रमाणे हिंदूंना दोन लग्न करण्याची परवानगी नाही, त्याचप्रमाणे मुस्लिमांनाही चार लग्न करण्याची परवानगी नसणार आहे.

COMMENTS