स्नेहआशा बालगृहांमधील बालकांच्या मुत्यूची चौकशी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्नेहआशा बालगृहांमधील बालकांच्या मुत्यूची चौकशी

घटनेचे माहिती, पुरावे असल्यास द्यावे उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचे आवाहन

अहमदनगर : स्नेहआशा विशेष बालगृहामधील चि.श्रीकांत सीताराम वनखंडे ( वय १४ वर्षे, १०‌ महिने ) याचा १ जून २०१४ आणि कु.वर्षा विलास शिंदे हीचा २७ फेब्रुवार

विवाहितेचा छळ करणार्‍या पती व सासूविरोधात गुन्हा
पत्नीचा खून करणार्‍या पतीस कठोर शिक्षा व्हावी
दीपावली पाडवा निमित्त माजी आ.मुरकुटे यांच्याकडून व्यापार्‍यांच्या भेटी गाठी

अहमदनगर : स्नेहआशा विशेष बालगृहामधील चि.श्रीकांत सीताराम वनखंडे ( वय १४ वर्षे, १०‌ महिने ) याचा १ जून २०१४ आणि कु.वर्षा विलास शिंदे हीचा २७ फेब्रुवारी २०१३ रोजी मृत्यु झालेला आहे. या मुलांच्या मृत्यूच्या घटनेसंबंधी माहिती, पुरावे आणि दंडाधिकारी चौकशीस उपयोगी पडेल अशी माहिती कोणाकडे असल्यास त्या व्यक्तींनी १० ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता ‘उपविभागीय दंडाधिकारी, नगर भाग, अहमदनगर’ या कार्यालयात सुनावणीस उपस्थित राहून माहिती देऊ द्यावी. असे आवाहन नगर भागाचे उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले जिल्हाधिकारी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १७६ मधील तरतुदीनुसार ‘उपविभागीय दंडाधिकारी, नगर भाग. अहमदनगर” यांची या घटनेच्या दंडाधिकारी चौकशीकामी नियुक्ती केलेली आहे. दंडाधिकारी चौकशीला आवश्यक माहिती व्यक्तींनी लेखी सादर करावी. यामध्ये माहिती देणाराचे संपूर्ण नाव, वय व पूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक, लेखी माहिती देतांना स्वतःची स्वाक्षरी करावी. तसेच मृत्यू संबंधीच्या बाबी व दृश्याच्या बाबींचा सविस्तर मजकूर असावा. असे आवाहनही प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री.अर्जुन यांनी केले आहे.

COMMENTS