पुरंदरेंच्या लिखाणातून शिवरायांवर अन्याय : शरद पवार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुरंदरेंच्या लिखाणातून शिवरायांवर अन्याय : शरद पवार

पुणे : दिवंगत बाबासाहेब पुरंदरेंची भाषणे, त्यांचे लिखाण, त्यांची पुस्तके मला कधीच पटली नाही. कारण त्यांच्या लिखाणांतून कायमच छत्रपती शिवाजी महाराजांव

दूध उत्पादकांचा येवला पैठणी देऊन सन्मान
नागपुरात सीएनजी 10 रुपयांनी स्वस्त
धर्मवीर 2 च्या शुटींगला सुरुवात

पुणे : दिवंगत बाबासाहेब पुरंदरेंची भाषणे, त्यांचे लिखाण, त्यांची पुस्तके मला कधीच पटली नाही. कारण त्यांच्या लिखाणांतून कायमच छत्रपती शिवाजी महाराजांवर अन्याय केला, अशी भूमिका राष्ट्रवादी काँगे्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी पुण्यात मांडली. श्रीमंत कोकाटे लिखित ‘शिवचरित्र आणि विचारप्रवाह’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शरद पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यात रामदास यांचे योगदान काय? दादोजी कोंडदेवचे योगदान काय? अशा अनेकजणांचे संबंध जाणीवपूर्वक जोडले गेले. दादोजी कोंडदेव व शिवाजी महाराजांचा कोणताही संबंध नव्हता. राजेंना दिशा देण्याचे काम जिजाऊ माता यांनी केले. इतिहासातील अनेक सत्य गोष्टी अनेकांना न पटणार्‍या आहेत. त्यामुळे मी खोलात जात नाही.

COMMENTS