वेळ मर्यादेविरोधात निवेदन ; आंदोलनाचा इशारा शेवगाव : येथील भाजी मंडईमध्ये शेतकऱ्यांवर लादण्यात आलेल्या सक्तीच्या वेळ मर्यादा, भेदभाव आणि आर्थिक शोषणाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना, वंचित आघाडी माजी सैनिक अध्यक्ष व शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मंडईत सकाळी ११ वाजेपर्यंतच भाजी विक्री करण्याची सक्ती केली जात असून त्यानंतर शेतकऱ्यांना जबरदस्तीने उठवले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. तालुक्यातील तसेच स्थानिक शेतकरी स्वतः पिकवलेला ताजा भाजीपाला विक्रीसाठी मंडईत आणतात. नगरपरिषदेचे अधिकृत शुल्क भरून पावती घेत असतानाही त्यांना मर्यादित वेळ दिली जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ग्रामीण भागातून पहाटेपासून प्रवास करून येणाऱ्या शेतकऱ्यांना काही तासांतच विक्री संपवण्याची वेळ येत असल्याने उरलेला भाजीपाला व्यापाऱ्यांना कमी दरात विकावा लागतो किंवा खराब होण्याची शक्यता निर्माण होते. महाराष्ट्रातील इतर बाजारपेठांमध्ये अशी वेळ मर्यादा नसताना शेवगाव नगरपरिषदेकडून हा नियम कोणत्या कायदेशीर तरतुदीनुसार लागू केला आहे, याचे लेखी स्पष्टीकरण देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना दिवसभर भाजी विक्रीसाठी सन्मानपूर्वक जागा देणे, व्यापारी व शेतकरी यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करणे आणि शेतकऱ्यांवरील आर्थिक व मानसिक छळ थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. सात दिवसांत लेखी उत्तर न दिल्यास १६ मार्च २०२६ रोजी तहसील कार्यालयासमोर प्रतीकात्मक मोफत भाजीपाला वाटप करून निषेध आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. त्यानंतरही निर्णय न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्ता फुंदे, वंचित बहुजन आघाडीचे प्रीतम गरजे, माजी सैनिक तालुका अध्यक्ष शिवाजी बडे. काँग्रेसचे समद काझी राजु घनवट आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
वेळ मर्यादेविरोधात निवेदन ; आंदोलनाचा इशारा

शेवगाव : येथील भाजी मंडईमध्ये शेतकऱ्यांवर लादण्यात आलेल्या सक्तीच्या वेळ मर्यादा, भेदभाव आणि आर्थिक शोषणाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना, वंचित आघाडी माजी सैनिक अध्यक्ष व शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मंडईत सकाळी ११ वाजेपर्यंतच भाजी विक्री करण्याची सक्ती केली जात असून त्यानंतर शेतकऱ्यांना जबरदस्तीने उठवले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
तालुक्यातील तसेच स्थानिक शेतकरी स्वतः पिकवलेला ताजा भाजीपाला विक्रीसाठी मंडईत आणतात. नगरपरिषदेचे अधिकृत शुल्क भरून पावती घेत असतानाही त्यांना मर्यादित वेळ दिली जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ग्रामीण भागातून पहाटेपासून प्रवास करून येणाऱ्या शेतकऱ्यांना काही तासांतच विक्री संपवण्याची वेळ येत असल्याने उरलेला भाजीपाला व्यापाऱ्यांना कमी दरात विकावा लागतो किंवा खराब होण्याची शक्यता निर्माण होते.
महाराष्ट्रातील इतर बाजारपेठांमध्ये अशी वेळ मर्यादा नसताना शेवगाव नगरपरिषदेकडून हा नियम कोणत्या कायदेशीर तरतुदीनुसार लागू केला आहे, याचे लेखी स्पष्टीकरण देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना दिवसभर भाजी विक्रीसाठी सन्मानपूर्वक जागा देणे, व्यापारी व शेतकरी यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करणे आणि शेतकऱ्यांवरील आर्थिक व मानसिक छळ थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे.
सात दिवसांत लेखी उत्तर न दिल्यास १६ मार्च २०२६ रोजी तहसील कार्यालयासमोर प्रतीकात्मक मोफत भाजीपाला वाटप करून निषेध आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. त्यानंतरही निर्णय न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्ता फुंदे, वंचित बहुजन आघाडीचे प्रीतम गरजे, माजी सैनिक तालुका अध्यक्ष शिवाजी बडे. काँग्रेसचे समद काझी राजु घनवट आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS