Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अल्पभूधारक शेतकर्यां ना सक्षम करण्यासह शेतीतील नासाडी कमी करण्यासाठी मायक्रो एन्टरप्राईज उपक्रमाची सुरुवात 

नाशिक - डियाजिओ इंडिया (युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड), या  देशातील अग्रगण्य अल्को-बेव्ह कंपन्यांपैकी एक, नाशिकमध्ये अल्पभूधारक महिला शेतकऱ्यांना सक

राज्यात पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे
न्यायालयाकडून संजय राऊतांना मोठा झटका
उपचारानंतर कॅन्सरग्रस्त रुग्णही चांगले आयुष्य जगू शकतो : डॉ. सुरेश भोसले

नाशिक – डियाजिओ इंडिया (युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड), या  देशातील अग्रगण्य अल्को-बेव्ह कंपन्यांपैकी एक, नाशिकमध्ये अल्पभूधारक महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी एक अनोखा सूक्ष्म उपक्रम सुरू केला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात १०० महिला शेतकर्यांहना पिकांचे किमान नुकसान करणे, अन्नाची किमान नासाडी आणि शाश्वत जीवनशैलीचा अंगिकार करण्यास सक्षम करण्यात येणार आहे.  सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळ (एसपीएमईएसएम) या अंमलबजावणी भागीदार संस्थेच्या सहकार्यातून तसेच एस४एस टेक्नॉलॉजिज या तंत्रज्ञान भागीदाराच्या सहकार्याने डियाजिओ इंडिया कडून या अल्पभूधारक शेतकरी महिलांना प्रशिक्षण, अर्थसहाय्य आणि उपकरणे उपलब्ध करुन देऊन त्यांची अधिकची आलेली उत्पादने सूर्यप्रकाशात वाळवल्यानंतर त्यांना ग्राहकांशी जोडणी करुन पुरवठा शृंखलेची व्यवस्था करुन दिली जाणार आहे.या उपक्रमाचे आयोजन डियाजिओच्या सोसायटी २०३०: स्पिरिट ऑफ प्रोग्रेस प्लान अंतर्गत करण्यात येत असून या अंतर्गत स्थानिक लोकांकडून खरेदी करुन त्यांचे आर्थिक आणि पर्यावरणीय उत्थान करण्यात येणार आहे.  त्याच बरोबर त्यांच्याकडून युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल १२.३  अंतर्गत पर कॅपिटा जागतिक अन्नाचे नुकसान कमी करुन, उत्पादनातील व पुरवठा शृंखलेतील नासाडी कमी करण्यासह सुगीनंतरची नासाडी कमी करण्यावरही भर देण्यात आला आहे.  या उपक्रमा अंतर्गत महिलांना काही कौशल्ये शिकवण्यात येणार असून यामध्ये कापणी, एअर ड्राय आणि सोलर ड्राय व्हेजिटेबल प्रोग्राम चा समावेश असून यामुळे टॉमॅटो, कांदा आणि आल्यासारख्या पदार्थांचा समावेश आहे.  त्यानंतर ही उत्पादने हॉटेल्स, रेस्तराँ आणि घटक उत्पादक कंपन्यांना पुरवण्यात येणार असून यामुळे बाजारपेठेला सातत्यपूर्ण पुरवठा मिळून महिलां सह छोट्या कंपन्यांचा महसूल वाढून त्यांना शाश्वत उत्पन्न मिळेल त्याचबरोबर संपूर्ण मुल्यशृंखला सुध्दा सक्षम होऊ शकेल.डियाजिओ इंडिया चे कॉर्पोरेट रिलेशन्स डायरेक्टर जगबीर सिंग सिध्दू यांनी सांगितले “ डियाजिओ इंडिया मध्ये आम्ही नेहमीच ग्रेन टू ग्लास शाश्वततेसाठी पहिल्यांदाच प्रयत्न करणे आमच्या सोसायटी २०३०: स्पिरीट ऑफ इएसजी प्लॅन साठी वचनबध्द आहोत.  एसपीएमईएसएम आणि एस४एस टेक्नॉलॉजी बरोबरची ही भागीदारी म्हणजे बाजारपेठ आणि कृषी क्षेत्रातील सर्व महत्त्वपूर्ण घटकाबरोबर काम करुन योग्य आणि शाश्वत उपाय देण्यास वचबध्द असल्याचे द्योतक आहे.  या उपक्रमा मुळे छोट्या शेतकर्यांरना जागतिक स्तरावरील भारताचे योगदान देण्यासाठी असलेल्या प्रयत्नांना चालना मिळून लोकांना त्यांचे आयुष्य सुरक्षित करण्याची संधी देत आहोत.”

COMMENTS