Homeताज्या बातम्यादेश

लग्न समारंभात लष्करी जवानाचा अंदाधुंद गोळीबार

चंदीगड ः पंजाबमध्ये बंदुक संस्कृतीवर नियंत्रण मिळवल्याचे सरकाच्या दाव्याची पुन्हा एकदा पोलखोल झाली आहे. तरनतारनमधील  सीमावर्ती गाव झुग्गिया कालू

नागपूर दंगलीचा मास्टरमाईंड जेरबंद ; फहीम खानवर हिंसाचाराचा ठपका
मतदान आणि आयोग !
राणे साहेबांनाही अटक झाली होती, त्यांचा राजीनामा घेतला का? | LOKNews24

चंदीगड ः पंजाबमध्ये बंदुक संस्कृतीवर नियंत्रण मिळवल्याचे सरकाच्या दाव्याची पुन्हा एकदा पोलखोल झाली आहे. तरनतारनमधील  सीमावर्ती गाव झुग्गिया कालू येथे लग्न समारंभात नवरदेवाच्या मावस भावाने दारूच्या नशेत गोळीबार केला. यामध्ये एक गोळी नवरदेवाच्या  बहिणीच्या पतीला लागून त्यांचा मृत्यू झाला. गुरदित्त सिंग (वय 34, नौशहरा पन्नुआ) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गोळीबार करणारा भारतीय लष्करात हवालदार पदावर कार्यरत असून घटनेनंतर फरार आहे.

COMMENTS