Homeताज्या बातम्यादेश

स्वदेशी विमान ‘तेजस’ राजस्थानमध्ये कोसळले

जैसलमेर ः भारत शक्ती युद्धाभ्यासमध्ये सामील असलेले तेजस लढाऊ विमान क्रॅश झाले. जैसलमेर शहरापासून दोन किमी अंतरावर असलेल्या भिल्ल समाजाच्या वसतिगृ

‘आप’ खासदार संजय सिंह यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर
पुण्यात पुन्हा हिट अँड रन; पोलिसाचा मृत्यू
तिरुपतीला पाच किलो सोन्याची तलवार अर्पण DAINIK LOKMNTHAN

जैसलमेर ः भारत शक्ती युद्धाभ्यासमध्ये सामील असलेले तेजस लढाऊ विमान क्रॅश झाले. जैसलमेर शहरापासून दोन किमी अंतरावर असलेल्या भिल्ल समाजाच्या वसतिगृहावर मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास विमान क्रॅश झाले. घटनेच्या वेळी वसतिगृह रिकामे होते. त्यामुळे फारसे नुकसान झाले नाही. पोखरणमध्ये सुरू असलेल्या युद्धाभ्यास ठिकाणापासून सुमारे 100 किमी अंतरावर हा अपघात झाला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक नेते आणि लष्कराचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.

COMMENTS