Homeताज्या बातम्याविदेश

ऑलिपिंकमध्ये भारताचा डबल धमाका

मनू-सरबजोतसिंगने पटकावले कांस्यपदक

पॅरीस ः पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकर आणि सरबज्योतसिंग या भारतीय जोडीने 10 मीटर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदकाच्या लढतीत कोरियाचा 16-10

विनोद कांबळीची पत्नीसह मुलाला मारहाण
अभिनेता माधवनच्या मुलाची भरारी
आंतर महाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत छत्रपती शिवाजी कॉलेजला पाच पदके

पॅरीस ः पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकर आणि सरबज्योतसिंग या भारतीय जोडीने 10 मीटर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदकाच्या लढतीत कोरियाचा 16-10 असा पराभव केला. तसेच एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदक जिंकणारी मनू भाकर पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने दुसरे पदक जिंकले आहे. मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी दक्षिण कोरियाच्या ली वोंहो आणि ओ ये जिन या जोडीचा 16-10 असा पराभव करून कांस्यपदक जिंकले. 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत भारताला हे पदक मिळाले आहे. मनू भाकरचे हे दुसरे ऑलिम्पिक पदक आहे. पॅरीस ऑलिम्पिकच्या स्पर्धेत भारताच्या मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदक पटकावले आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला हे पहिले कांस्यपदक मिळालं आहे. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भाकर ही पहिली महिला नेमबाज ठरली होती.
दरम्यान, मनूने पदक जिंकल्यानंतर आपल्या यशाचे रहस्य सांगतांना मी आध्यात्मिक आणि ध्यानधारणा या बाबींमुळे खूप मजबूत बनल्याचे सांगितले. आपल्या जीवनावर भगवद्गीतेचा देखील मोठा परिणाम झाल्याचे ती सांगते. पिस्तूल हाती घेतल्यानंतर ते निशाणा साधेपर्यंत मनूचे पूर्ण लक्ष हे खेळावर केंद्रित असते, ही बाब सहज लक्षात येते. मनूच्या या एकाग्रतेचे रहस्य आहे, ते म्हणजे ध्यानधारणा. ध्यानधारणेसाठी मला मार्गदर्शन करणारे गुरू आहेत आणि हा माझ्या प्रशिक्षणाचा भाग आहे. ध्यानधारणेमुळे माझ्या एकाग्रतेमध्ये फार चांगली सुधारणा झाली आहे, असे तिने सांगितले. मी माझ्या गुरूंसोबत दररोज ध्यान करते. झोपी जाण्यापूर्वी ध्यान केल्याने फार चांगली झोप लागते. झोप चांगली असेल तर तुम्ही चांगले लक्ष केंद्रित करू शकता. माझे गुरू मला गीतेतील दोन श्‍लोक दररोज शिकवतात आणि या श्‍लोकाचा अर्थही सांगतात, असे तिने सांगितले. ध्यानामुळे आध्यात्मिक बाजू विकसित होते. एक ऊर्जा, किंवा परमेश्‍वर आपल्याकडे पाहात आहे आणि तो आपल्या कष्टाचे फळ देईल, अशी मानसिकता विकसित होते, असे ती म्हणाली.

COMMENTS