Homeताज्या बातम्याक्रीडा

भारतीय क्रिकेटर मुकेश कुमार यांनी बांधली लग्नगाठ

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार मंगळवारी रात्री विवाहबद्ध झाले .यूपीच्या गोरखपूरमधील एका हॉटेलमध्ये त्यांचे लग्न झाले. मुकेश कुम

दुबळ्या अफगाणिस्तानवर टिम इंडिया बरसली ; रागावलेल्या भारतीयांना दिवाळ भेट दिली !
ओम कदम याला बॉक्सिंगमध्ये सुवर्ण पदक
आंतर महाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत छत्रपती शिवाजी कॉलेजला पाच पदके

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार मंगळवारी रात्री विवाहबद्ध झाले .यूपीच्या गोरखपूरमधील एका हॉटेलमध्ये त्यांचे लग्न झाले. मुकेश कुमार यांनी सारणच्या बनियापूर बेरूई गावात राहणाऱ्या दिव्या सिंगला आपला जीवनसाथी म्हणून निवडले आहे .लग्नामुळे मुकेश मंगळवारी गुवाहाटीमध्ये झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात खेळला नव्हता. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, मुकेश 4 डिसेंबरला रायपूरमध्ये होणाऱ्या चौथ्या टी-20 सामना खेळणार. मुकेशच्या लग्नात सहभागी होण्यासाठी भारतीय संघातील अनेक क्रिकेटपटू आणि सेलिब्रिटीही गोरखपूरला पोहोचले होते .

केश कुमार यांच्या लग्नापूर्वीच्या हळदी समारंभाचा व्हिडिओही समोर आला आहे. क्रिकेटपटू मुकेश कुमार आणि त्याची भावी पत्नी दिव्या यांचा लग्नाआधीच्या हळदी विधीच्या वेळी होणाऱ्या गाण्यावर नृत्य करतानाचा व्हिडिओही त्याच्या काही मित्रांनी इंटरनेट मीडियावर शेअर केले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेत सध्या क्रिकेटर मुकेश कुमारचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. गोपालगंजच्या सदर ब्लॉकमधील काकरकुंड गावात राहणारे मृत काशिनाथ सिंह आणि मालती देवी यांचा मुलगा मुकेश कुमार यांचे वडील कोलकाता येथे टॅक्सी चालक म्हणून काम करायचे. कठोर परिश्रम आणि समर्पणाने, क्रिकेटर मुकेश कुमार आज क्रिकेट आणि गावातील गल्लीबोळातून उच्चस्तरीय खेळाडू बनले आहेत.

COMMENTS