भारतीय बौद्ध महासभा शहर शाखेतर्फे वर्षावास प्रवचन मालिकेस सुरुवात

Homeताज्या बातम्या

भारतीय बौद्ध महासभा शहर शाखेतर्फे वर्षावास प्रवचन मालिकेस सुरुवात

नगर (प्रतिनिधी)- नील क्रांती चौक गौतम नगर येथील गौतम बुद्ध विहारांमध्ये वर्षाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात त्रिसरण पंचशील बुद्ध पू

एआय-निर्मित पुराव्यावर निर्णय देणे अयोग्य
मुलाने केलेल्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू
 चांदवडला पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ ; चावा घेतल्याने सहा जण जखमी

नगर (प्रतिनिधी)

नील क्रांती चौक गौतम नगर येथील गौतम बुद्ध विहारांमध्ये वर्षाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात त्रिसरण पंचशील बुद्ध पूजा करून सुरुवात करण्यात आली त्यानंतर उपस्थितांचा सन्मान करण्यात आला त्यानंतर आषाढी पौर्णिमेनिमित्त आषाढी पौर्णिमेचे महत्व वर्षावासाची सुरुवात यावर जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे यांनी प्रवचन केले.

संस्कार उपाध्यक्ष भगवंत गायकवाड यांनी बुद्ध व धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन केले यावेळी
जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे, महिला जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड, संस्कार उपाध्यक्ष भगवंत गायकवाड, रवींद्र कांबळे, राहुल कांबळे, सिंधुताई साळवे, शहराध्यक्ष दिपक पाटोळे, सरचिटणीस गौतम पाचारणे, कोषाध्यक्ष विजय चाबुकस्वार, कार्यालयीन सचिव विजय पाटोळे, संस्कार उपाध्यक्ष लक्ष्मण माघाडे, प्रचार पर्यटन उपाध्यक्ष मोहनजी शिरसाठ, सचिव विशाल पवार, युवराज बनसोड, संजय डहाणे, यशराज बनसोड, शंकर पंडागळे, ललित भोसले, मारुती पाचरणे, पुष्पाताई खंडागळे, नंदाताई तडके, ऋतुजा शिंदे, अँड. विद्या शिंदे आदीसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.


यावेळी शहराध्यक्ष दिपक पाटोळे म्हणाले की, पुढील तीन महिने भारतीय बौद्ध महासभा अहिल्यानगर शहर शाखेतर्फे बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करण्याचं काम केले जाणार आहे .वर्षावासामध्ये जे विविध विषय घेतलेले आहेत त्याचे प्रवचन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे विविध शिबिरे शहरांमध्ये घेतली जाणार आहेत. वर्षावासाच्या त्यांनी सर्व बौद्ध समाजाला खूप खूप शुभेच्छा दिल्या. पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी धम्मपालन गाथा घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला त्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले.

COMMENTS