वाशिंग्टन/नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट दोन्ही देशाच्या नेत्यांनी द्विपक्षीय

वाशिंग्टन/नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट दोन्ही देशाच्या नेत्यांनी द्विपक्षीय संबंधावर चर्चा केली. त्यानंतर संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आम्ही तेल आणि वायू व्यापार अधिक मजबूत करू. ऊर्जा विषयक पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक देखील वाढेल. यासोबतख आम्ही द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत दुपटीने अधिक वाढवून 500 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवले असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पुढे बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, अमेरिकेतील लोक अध्यक्ष ट्रम्प यांच्या मेक अमेरिका ग्रेट अगेन म्हणजेच मागा या ब्रीदवाक्याशी परिचित आहेत. भारतातील लोक देखील वारसा आणि विकासाच्या मार्गावर विकसित भारत 2047 चा संकल्प घेऊन जलद गतीने विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. मी जर अमेरिकेच्या भाषेत म्हटले तर विकसित भारत म्हणजे ’मेक इंडिया ग्रेट अगेन ’ म्हणजेच मिगा . जेव्हा अमेरिका आणि भारत एकत्र काम करतात, म्हणजेच मागा आणि मिगा एकत्र येतात , तेव्हा समृद्धीसाठी मेगा (भागीदारी तयार होते. आणि हीच मेगा ( प्रचंड) भावना आपल्या उद्दिष्टांना नवीन व्याप्ती आणि वाव देते. यासोबतच अणुऊर्जा क्षेत्रात, आम्ही छोट्या मॉड्यूलर रिऍक्टर्सच्या दिशेने सहकार्य वाढवण्याबद्दल देखील चर्चा केली. भारताच्या संरक्षण सज्जतेत अमेरिकेची महत्त्वाची भूमिका आहे. धोरणात्मक आणि विश्वासार्ह भागीदार म्हणून, आम्ही संयुक्त विकास, संयुक्त उत्पादन आणि तंत्रज्ञानाचे हस्तांतरण या दिशेने सक्रियपणे पुढे जात आहोत. आगामी काळात, नवीन तंत्रज्ञान आणि उपकरणे आमची क्षमता वाढवतील. आम्ही ऑटोनॉमस सिस्टम्स इंडस्ट्री अलायन्स सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी दशकासाठी संरक्षण सहकार्य आराखडा तयार केला जाईल. संरक्षण आंतर-परिचालन क्षमता, लॉजिस्टिक्स, दुरुस्ती आणि देखभाल हे देखील त्याचे मुख्य घटक असतील. एकविसावे शतक हे तंत्रज्ञानाधारित शतक आहे. लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणार्या देशांमधील तंत्रज्ञान क्षेत्रातील घनिष्ट सहकार्य संपूर्ण मानवजातीला नवीन दिशा, बळकटी आणि संधी देऊ शकते. भारत आणि अमेरिका कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर, क्वांटम, जैवतंत्रज्ञान आणि अन्य तंत्रज्ञान क्षेत्रात एकत्र काम करतील. आज आपण ट्रस्ट (टीआरयूएसटी) वर, म्हणजेच धोरणात्मक तंत्रज्ञानाचा अवलंब करून संबंधांमध्ये परिवर्तन घडवण्यावर सहमती दर्शवली आहे. या अंतर्गत, महत्वाची खनिजे, प्रगत सामग्री आणि औषधांच्या मजबूत पुरवठा साखळ्या तयार करण्यावर भर दिला जाईल. लिथियम आणि पृथ्वीवरील दुर्मिळ सामरिक खनिजांची पुनर्प्राप्ती आणि प्रक्रिया उपक्रम सुरू करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. अंतराळ क्षेत्रात आमचे अमेरिकेसोबत गाढे सहकार्य आहे. इस्रो आणि नासा यांच्या सहकार्याने तयार केलेला निसार उपग्रह लवकरच भारतीय प्रक्षेपण वाहनाद्वारे अंतराळात प्रक्षेपित केला जाईल असेही यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
हिंद-प्रशांत क्षेत्रात स्थैर्य आणि समृद्धीसाठी एकत्र काम करू
भारत आणि अमेरिकेतील भागीदारी लोकशाही आणि लोकशाही मूल्ये आणि व्यवस्थांना आधार देते. हिंद-प्रशांत क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि समृद्धी वृद्धिंगत करण्यासाठी आम्ही एकत्र काम करू. यामध्ये क्वाड महत्वाची भूमिका बजावेल. या वर्षी भारतात होणार्या क्वाड शिखर परिषदेत, आम्ही नवीन क्षेत्रांमध्ये भागीदार देशांसोबत सहकार्य वाढवू. आयएमईसी आणि आय2यु2 उपक्रमांतर्गत, आम्ही आर्थिक कॉरिडॉर आणि कनेक्टिव्हिटी पायाभूत सुविधांवर सोबत काम करू, अशी ग्वाही यावेळी पंतप्रधान मोदी यांनी दिली.
COMMENTS