Homeताज्या बातम्यासंपादकीय

जागतिक पटलावर भारत केंद्रस्थानी

भारताने नेहमीच शांततेची भूमिका घेतली आहे. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर देखील तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू इतर देशांच्या संघर्षात आपले अलिप्तत

मराठा-ओबीसींतील तणाव !
दाभोळकर हत्या तपास आणि न्याय
काँगे्रसचा बदलता चेहरा

भारताने नेहमीच शांततेची भूमिका घेतली आहे. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर देखील तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू इतर देशांच्या संघर्षात आपले अलिप्ततावादी धोरण अवलंबले होते. या संघर्षात सहभाग न नोंदवता आणि कोणत्याही देशाची बाजू न घेता अलिप्त राहण्याचे धोरण संपूर्ण जगाने त्याची दाद घेतली हेाती. त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील रशिया आणि ऑस्ट्रिया दोन देशांच्या दौर्‍यावर आहेत. यावेळी त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची भेट घेतली. वास्तविक पाहता या भेटीवर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी आक्षेप घेतला आहे. मात्र पंतप्रधान मोदी यांनी दुसर्‍या दिवशी ठणकावून सांगितले की, जगाला शांतता हवी आहे. आणि रशिया-युक्रेन संघर्ष जरी अंतर्गत असला तरी, तो बंदुकीच्या जोरावर सुटणारा नसून तो शांततेच्या मार्गाने सुटणारा असल्याचे सांगितले. त्यामुळे जागतिक पटलावर भारताचे स्थान पुन्हा एकदा अधोरेखित होतांना दिसून येत आहे. भारताने नेहमीच समन्वयाची भूमिका घेत शांततेचे धोरण अवलंबिले आहे. ऑस्ट्रिया या देशामध्ये देखील पंतप्रधान मोदी यांनी जगाला युद्ध नको तर बुद्ध हवा असल्याचे ठणकावून सांगितले आहे. युद्धाच्या जोरावर कोणत्याच देशाचे प्रश्‍न सुटणार नाहीत, तर हा गुंता वाढतच जाणार आहे. युद्धाचे परिणाम आज युक्रेनमधील कोट्यावधी जनता त्याचे परिणाम भोगत आहे.

त्याचप्रकारे युक्रेनवर हल्ला करून रशियाचे देखील प्रश्‍न सुटले अशातला भाग नाही. तर रशियाने आपली आर्थिक नाकेबंदी करून घेतली आहे. तसेच युरोपीय देशांमध्ये रशियाविषयी नकारात्मक भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे भविष्यात जेव्हाही संधी मिळेल तेव्हा रशियाची कोंडी करण्याची एकही संधी युरोपातील देश सोडणार नाही. त्यामुळे युद्धामुळे संघर्ष आणि गुंता वाढत जातो. तर शांततेच्या मार्गाने अनेक प्रश्‍न सुटतात. त्यामुळे जगाला आज शांततेची गरज असल्याचे भारताने ठणकावून सांगितल्याने भारताचे जागतिक पटलावरील स्थान पुन्हा एकदा अधोरेखित होतांना दिसून येत आहे. यासोबतच अमेरिकेला भारताची आर्थिक क्षमता वेळीच लक्षात आली आहे. पाश्‍चात्य तंत्रज्ञान उपकरणे आणि उत्पादनांसाठी भारत ही एक मोठी उदयोन्मुख बाजारपेठ आहे जी आज सुमारे 3 ट्रिलियन डॉलरची जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. यामुळे अमेरिकेने भारतासोबत धोरणात्मक संबंध सुरू ठेवत भारताचे स्थान अधोरेखित केले आहे. अमेरिका भारताशी संबंध वाढवण्यास एवढी उत्सुक होती की, शीतयुद्धाच्या काळात भारत आणि रशिया यांच्यातील जुन्या मैत्रीपूर्ण संबंधांकडेही त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे जागतिक पातळीवर भारताचे स्थान पुन्हा एकदा उठून दिसतांना दिसून येत आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनंतर ऑस्ट्रियाच्या दौर्‍यावर जाणारे नरेंद्र मोदी पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. भारत आणि ऑस्ट्रिया त्यांच्या मैत्रीची 75 वर्षं पूर्ण होत असतांनाच पंतप्रधान मोदी यांची ऑस्ट्रिया भेट विशेष ठरतांना दिसून येत आहे. भारत हा सर्वाधिक लोकसंख्येचा देश असून, या देशामध्ये तरूणांची संख्या देखील सर्वाधिक आहे. याच बळावर भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येवू शकतो. असे असतांना भारताने रशियाची जरी भेट घेतली असली तरी, रशियाच्या हल्ल्याचे भारताने समर्थन केलेले नाही, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. रशियाची भेट घेवून पंतप्रधान मोदींनी बंदुकीच्या जोरावर प्रश्‍न सुटणार नाही, तर तो शांततेच्या मार्गानेच सुटेल असे सांगत रशियाच्या महत्वाकांक्षी धोरणाला वेसण घालत त्यांचे डोळे उघडले आहे. त्यामुळे भारताचे महत्व वेगळ्या अर्थाने अधोरेखित होतांना दिसून येत आहे. खरंतर रशिया-युक्रेन संघर्षाच्या दबावामुळे युरेशियन सुरक्षा व्यवस्था बदलते आहे. या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतांना दिसून येत आहे. या युद्धामुळे ब्रिटनसह युरोपीय देशांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. मात्र अशा परिस्थितीत रशिया हा भारताचा मित्र देश असला तरी, भारताने रशियाला दिलेला शांततेच्या संदेश आज जागतिक पटलावर अधोरेखित होतांना दिसून येत आहे.

COMMENTS