नवी दिल्ली ः भारत हा देश सर्वाधिक शस्त्रास्त्रांची आयत करणारा देश असल्याचे स्पष्ट झाले आहे. विविध प्रकारच्या शस्त्रांस्त्रांची खरेदी आणि विक्री प
नवी दिल्ली ः भारत हा देश सर्वाधिक शस्त्रास्त्रांची आयत करणारा देश असल्याचे स्पष्ट झाले आहे. विविध प्रकारच्या शस्त्रांस्त्रांची खरेदी आणि विक्री प्रक्रियेवर लक्ष ठेवून असलेल्या स्वीडनच्या ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. भारत हा जगातला सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार देश असल्याचे या अहवालात म्हटले आहे. 2018-2022 दरम्यान भारत, सौदी अरेबिया, कतार, ऑस्ट्रेलिया आणि चीन हे जगातील पाच सर्वात मोठे शस्त्रास्त्र आयातदार देश ठरले आहेत. तर अमेरिका, रशिया, फ्रान्स, चीन आणि जर्मनी हे पाच सर्वात मोठे शस्त्रास्त्र निर्यातदार देश ठरले आहेत. 2018-22 या कालावधीत पाकिस्तान हा जगातला आठवा सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयात करणारा देश ठरला आहे.
पाकिस्तानच्या शस्त्रास्त्र आयातीत गेल्या काही वर्षात 14 टक्क्यांनी वाढ झाली असून चीन हा पाकिस्तानचा मुख्य पुरवठादार असल्याचे या अहवालात म्हटले आहे. 2018-22 या वर्षांदरम्यान फ्रान्सने एकूण शस्त्रास्त्र निर्यातीपैकी 30 टक्के निर्यात भारताला केली असल्याचे या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे फ्रान्स हा भारताला शस्त्रपुरवठा करणारा रशियानंतर दुसर्या क्रमांकाचा देश ठरला आहे. भारताला शस्त्रास्त्र निर्यात करणारा अमेरिका हा तिसर्या क्रमांकाचा देश ठरला आहे. भारताची फ्रान्सकडून शस्त्रास्त्र आयात वाढल्याने रशियाकडून होणारा शस्त्रपुरवठा कमी होत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 2013-17 आणि 2018-22 या कालावधीत फ्रान्सच्या शस्त्रास्त्र निर्यातीमध्ये तब्बल 44 टक्क्यांनी वाढ झाली असून फ्रान्सकडून बहुतांश शस्त्रास्त्र निर्यात ही आशिया खंडातील देश, ओशिआनिया भागातील देश आणि मध्य पूर्वेतील देशांचा समावेश आहे.
COMMENTS