नवी दिल्ली : भारत सरकारने कोरोना साथरोगाच्या विरोधातील लढाईला अधिक बळकटी देण्याचा निर्णय घेतलाय. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना आरोग्य आणि कुटुंब
नवी दिल्ली : भारत सरकारने कोरोना साथरोगाच्या विरोधातील लढाईला अधिक बळकटी देण्याचा निर्णय घेतलाय. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत, कोवोव्हॅक्स आणि कॉर्बेवॅक्स या कोरोना प्रतिबंधात्मक लसी आणि अँटी-व्हायरल औषध मोलनुपिरावीरच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे. आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्वीट करत ही माहिती दिली.
यासंदर्भातील ट्विटर संदेशात आरोग्य मंत्र्यांनी देशाचे अभिनंदन केलं आहे. आरोग्य मंत्री म्हणाले की, मोलनुपिरावीर हे कोविड-19 च्या प्रौढ रूग्णांवर उपचार करण्यासाठी देशातील 13 कंपन्यांनी विकसित केलेले अँटीव्हायरल औषध आहे. जे आणीबाणीच्या परिस्थितीत प्रतिबंधित वापरासाठी उत्पादित केले जाईल.आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी सांगितले की, व्हायरसविरोधी औषध मोलनुपिरावीर आता देशातील 13 कंपन्यांमध्ये बनवले जाईल. जे कोविड-19 च्या प्रौढ रूग्णांना आपत्कालीन परिस्थितीत उपचारासाठी दिले जाईल. ज्यांना हा आजार होण्याचा धोका जास्त असेल त्यांनाच हे औषध उपलब्ध असेल. हे औषध कोविड-19 विरुद्ध अत्यंत प्रभावी मानले जाते. संशोधनात असे दिसून आले आहे की, ज्या रुग्णांना मोलनुपिराविर हे औषध देण्यात आले होते, त्यांना 14 दिवसांच्या निरीक्षणादरम्यान प्रमाणित काळजी घेतलेल्या रुग्णांच्या तुलनेत रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता खूपच कमी होती.
COMMENTS