Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विवेक कोल्हे यांचा नाशिक शिक्षक मतदार संघातून अपक्ष अर्ज

कोपरगाव शहर ः माजी मंत्री सहकार महर्षी स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांचे नातू व भारतीय जनता पार्टीच्या कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार स

जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीचा विवेक कोल्हेंना पाठिंबा
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची विवेक कोल्हे यांनी केली पाहणी
नवरात्रोत्सवातच नव्हे तर वर्षभर स्त्रीशक्तीचा आदर करा ः विवेक कोल्हे

कोपरगाव शहर ः माजी मंत्री सहकार महर्षी स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांचे नातू व भारतीय जनता पार्टीच्या कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांचे सुपुत्र युवा नेते विवेकभैया बिपिनदादा कोल्हे यांनी शुक्रवार दि 31 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता नाशिक शिक्षक मतदार संघातुन नाशिक विभागीय कार्यालयात विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या कडे आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून याप्रसंगी त्यांच्यासोबत नीलिमाताई पवार, समीर वाघ, साळुंखे, राजेंद्र कोहकडे, अजयकुमार ठाकूर, रावसाहेब शेंडगे, सचिन देसले आदि शिक्षक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाशिक शिक्षक मतदार संघाचा 5 जिल्ह्याचा व 54 तालुक्याचा विस्तार आसलेल्या या मतदार संघात साधारणपणे 70 हजार मतदार आहे. या निवडणुकीत विद्यमान आमदार किशोर दराडे यांनी जोरदार प्रचार सुरू केला असताना भाजपचे कोपरगावचे युवा नेते विवेकभैय्या कोल्हे व भाजपचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे बंधू डॉ राजेंद्र विखे-पाटील यांनी प्रचारात उडी घेत उमेदवारी करण्याचा निर्णय घेतल्याने भाजप श्रेष्ठींपुढे तिकीट कोणाला द्यावा याचा मोठा पेच निर्माण झाला आहे.

COMMENTS