कर्जतमध्ये महसूल कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जतमध्ये महसूल कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन

कर्जत/प्रतिनिधी : वाळू व्यवसाय करणारा पोलीस कर्मचारी केशव व्हरकटे यास बडतर्फ करावे. त्याने शासकीय कामात अडथळा आणला म्हणून त्याच्यावर भादवि कलम ३५३ अन

परमबीर आणि राज्य सरकारलाही तात्पुरता दिलासा
स्वप्न अपूर्ण राहिलं..! लहान बहिणीला वनरक्षक भरतीसाठी घेऊन जाणाऱ्या सख्या बहीण भावांना ट्रक ने चिरडले
अभिनेत्री माहिरा खान दुसऱ्यांदा अडकली लग्न बंधनात!

कर्जत/प्रतिनिधी : वाळू व्यवसाय करणारा पोलीस कर्मचारी केशव व्हरकटे यास बडतर्फ करावे. त्याने शासकीय कामात अडथळा आणला म्हणून त्याच्यावर भादवि कलम ३५३ अन्वये गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सोमवारपासून कर्जत महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयाबाहेर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
या आंदोलनामध्ये महसूल संघटना, कामगार तलाठी संघटना व कोतवाल संघटना या सहभागी झाल्या. विविध राजकीय संघटना व नागरिकांनी देखील या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. याबाबत घडलेली घटना अशी, कर्जतचे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी १९ नोव्हेंबर रोजी सकाळी कर्जत शहरातील बालाजी नगर परिसरात बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला. त्यावेळी कर्जत येथे कार्यरत असणारा पोलीस कर्मचारी केशव व्हरकटे याने प्रांताधिकारी यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली व तो ट्रक पळवून नेला. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पोलीस कर्मचाऱ्यास निलंबित केले 
मात्र या कारवाईमुळे महसूल कर्मचारी संघटनेचे समाधान झाले नसुन वाळूसारख्या अवैध व्यवसायांमध्ये गुंतलेला व शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण करणारा पोलीस कर्मचारी बडतर्फ करावा व त्याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदवला जावा या मागणीसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनात संघटनांचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे.Attachments area

COMMENTS