कन्नड ः सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून हताश झालेल्या जामडी जहागीर (ता.कन्नड ) येथील शेतकर्याने पत्र्याच्या शेडला गळफास घेऊन आत्महत्या के

कन्नड ः सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून हताश झालेल्या जामडी जहागीर (ता.कन्नड ) येथील शेतकर्याने पत्र्याच्या शेडला गळफास घेऊन आत्महत्या केली. उत्तम अण्णा जाधव (55) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्याचे नाव आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करीत आहे, अशी एक ओळ लिहिलेली चिठ्ठी त्यांच्या खिशात आढळून आली आहे. उत्तम जाधव हे कुटुंबासह जामडी जहागीर शिवारात असलेल्या (गट क्रमांक 111) या शेतात राहतात. त्यांना तीन एकर शेती आहे. अल्प व सततच्या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले.
COMMENTS