Indapur : राज्य सरकारने घेतलेल्या मंदिरे खुली करण्याच्या निर्णयाचे स्वागत (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Indapur : राज्य सरकारने घेतलेल्या मंदिरे खुली करण्याच्या निर्णयाचे स्वागत (Video)

आज  ७ आँक्टोबर पासून  शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरूवात झाली . घटस्थापनेच्या शुभ मुहुर्तावर धार्मिक मंदिरे आणि प्रार्थनास्थळाची दारं आता खु

Indapur : पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनांच्या कारवाईने वाळू माफियांचे धाबे दणाणले| LokNews24
Indapur : बावडा शहाजीबाग येथे भीषण अपघात (Video)
Indapur : इंदापूरात चपली चोरणाऱ्या महिलांची टोळी सक्रिय (Video)

आज  ७ आँक्टोबर पासून  शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरूवात झाली . घटस्थापनेच्या शुभ मुहुर्तावर धार्मिक मंदिरे आणि प्रार्थनास्थळाची दारं आता खुली करण्याचा निर्णय घेतला असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आता ओसरला असल्याने राज्य सरकारने बंद असलेली प्रार्थनास्थळे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने या शासन निर्णयाचे बावडा गावातील भागातील ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.

नवरात्र महोत्सवानिमीत्ताने बावडा येथील पदमावती माता मंदिराला आकर्षक अशी  विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. बावडा बाजारतळ नजीक असणारे पदमावती मातेचे मंदिर कोरोनाच्या पाश्वभुमीवर गेली दीड वर्षापासून बंदच होते. त्यामुळे पदमावती मातेचे दर्शन भाविक भक्तांना घेता आले नव्हते. राज्यसरकारने शारदीय नवरात्र महोत्सव घटस्थापनेला मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतल्याने सोशलडिस्टन्स नियमांचे पालन करून पदमावती माता मंदिर परिसरात भाविक भक्तांनी स्थानिक महिलांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.

COMMENTS