Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गडाखांच्या कारखान्याला आयकरची नोटीस ; तब्बल 137 कोटी भरण्याचे दिले आदेश

अहिल्यानगर : राज्यात निवडणुकीची धामधूम सुरू असतांनाच नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख अडचणीत आले आहेत. मुळा सहकारी साखर कारखान्याबाबत गडाखांच्या साखर

राष्ट्रीय शुटिंग बॉल स्पर्धेसाठी देवळातील प्रज्ञा आणि प्रगतीची निवड
जापनीज सेन्सयी हिरायमा आझुमी यांची न्यू आर्ट्समध्ये संयुक्त शैक्षणिक प्रोग्रामसाठी भेट
नगरला सेक्स रॅकेटचे ग्रहण?… त्या महिलेचा पर्दाफाश करा

अहिल्यानगर : राज्यात निवडणुकीची धामधूम सुरू असतांनाच नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख अडचणीत आले आहेत. मुळा सहकारी साखर कारखान्याबाबत गडाखांच्या साखर कारखान्याला आयकर खात्याने नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये कारखान्याला 137 कोटी रुपये भरण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर ही नोटीस आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
सोनई येथील मुळा सहकारी साखर कारखाना हा माजी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या अधिपत्याखाली येतो. शंकरराव गडाख यांनी शिवसेना उध्दव ठाकरे गटात प्रवेश केले आहे. केवळ एकाच कारखान्याला नोटीस देण्यात आल्याने अनेक चर्चा सध्या परिसरात रंगू लागल्या आहेत. तर यामागे राजकरण असल्याचा गडाख यांनी आरोप केला आहे. परिणामी, याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही शंकरराव गडाख म्हणाले आहे. या कारवाई विरोधात उद्या शंकरराव गडाख कार्यकर्ता मेळावा घेणार असल्याचीही माहिती पुढे आली आहे. तर यापूर्वी सुद्धा संस्था अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला असल्याचेही ते म्हणाले. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शंकरराव गडाखांच्या साखर कारखान्याला आयकर खात्याची नोटीस आल्याने जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

COMMENTS