Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिकमध्ये आयकर विभागाचे छापे

बांधकाम व्यावसायिकांच्या तब्बल ७५ ठिकाणांवर पथक दाखल

नाशिक प्रतिनिधी :-  शहरात एकाचवेळी १० हून अधिक बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. त्यामुळे शहरातील बांधकाम क्षेत्रामध्ये एकच ख

एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ..!- परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती
महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेतील पदकधारकांना अनुदान मंजूर
कोतुळमध्ये पोलिस दलाचे पथ संचलन

नाशिक प्रतिनिधी :-  शहरात एकाचवेळी १० हून अधिक बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. त्यामुळे शहरातील बांधकाम क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळीच आयकर विभागाच्या विविध पथकांनी तब्बल ७५ ठिकाणांवर हे छापे टाकले आहेत.

नाशिकच्या मेनरोडवर तसेच, या बांधकाम व्यावसायिकांची निवासस्थाने, कार्यालय, त्यांच्या मॅनेजरसह महत्त्वाच्या व्यक्तींची निवासस्थाने याठिकाणी आयकरचे पथक दाखल झाले आहेत. या छाप्यांमध्ये नामांकीत बांधकाम व्यावसायिकांचा समावेश आहे. त्यामुळे आयकर विभागाच्या हाती मोठे घबाड लागण्याची शक्यताही वर्तविली जात आहे

आयकर विभागाचे अधिकाऱ्यांच्या नेतृत्वातील या पथकांनी एकाचवेळी बांधकम व्यावसायिकांची निवासस्थाने, कार्यालय, फार्म हाऊस आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांवर छापा टाकला आहे. ७४ ठिकाणांवर जवळपास १५० पेक्षा अधिक आयकर अधिकारी व कर्मचारी दाखल असल्याचे सांगितले जाते. हे सर्व अधिकारी नाशिक, औरंगाबाद , पुणे , मुंबई येथील असल्याचे सांगितले जाते

आयकर विभागाच्या छाप्यांनी नाशिकच्या बांधकाम क्षेत्रामध्ये मोठीच खळबळ उडाली आहे. अचानक हे छापे पडले. त्यातच शहरातील अत्यंत नामांकीत बांधकाम व्यावसायिक  या छाप्यांमध्ये लक्ष करण्यात आले आहेत. हे छापे नक्की कशासाठी टाकण्यात आले, आयकर चोरी की अघोषित संपत्ती की अन्य काही हे अद्याप समजू शकलेले नाही. आज सायंकाळपर्यंत यासंदर्भात अधिकृत माहिती मिळण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, या बांधकाम व्यावसायिकांकडील सर्व कागदपत्रांची छाननी, बँक खात्यांचा तपशील अशा सर्वच बाबींची पडताळणी या पथकांनी सुरू केली आहे.

COMMENTS