Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

नाशिक / प्रतिनिधी : शहरात आयोजित 34 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी दुपारी चार वाजता होणार आहे. त्र्यंबक रस्त्यावरी

राष्ट्रीय युवा महोत्सवातून युवा शक्तीला ‘विकसित भारत’  साकार करण्याची प्रेरणा मिळेल –  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 
पायाभूत विकासासह महाराष्ट्र सर्व क्षेत्रात अग्रेसर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
‘चांद्रयान’ मोहिमेचे यश हा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उत्स्फूर्त भावना 

नाशिक / प्रतिनिधी : शहरात आयोजित 34 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी दुपारी चार वाजता होणार आहे. त्र्यंबक रस्त्यावरील महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे. पोलीस महासंचालक व आयोजक समितीच्यावतीने आयोजित स्पर्धेत राज्यभरातील पोलीस दलातील खेळाडू सहभागी झाले आहेत. उद्घाटनप्रसंगी सहभागी संघांचे संचलन होईल. 6 फेब्रुवारी रोजी या स्पर्धांना प्रारंभ झाला आहे. या अंतर्गत फुटबॉल, कबड्डी, बास्केटबॉल, हॅण्डबॉल, खो-खो, कबड्डी, वेटलिफ्टिंग, पॉवर लिफ्टिंग, थलेटिक्स, व्हॉलिबॉल आदी 17 क्रीडा प्रकारात सामने होत आहेत.

व्हॉलीबॉल सामन्यात प्रशिक्षण संचालक संघाने नागपूर शहर संघावर विजय मिळवला. महिलांच्या गटात नागपूर शहराने नागपूर परिक्षेत्राविरुद्ध विजय मिळवला. महिला गटातील अन्य सामन्यात प्रशिक्षण संचालक संघाने मुंबई शहरला तर पुरुषांच्या सामन्यात कोल्हापूर परिक्षेत्र संघाने नागपूर परिक्षेत्र संघाला पराभूत केले. वेटलिफ्टिंगमध्ये महिला गटात अजिंक्यपद मुंबई शहरला मिळाले. द्वितीयस्थानी प्रशिक्षण संचलनालय, तृतीय क्रमांक कोल्हापूर परिक्षेत्राला मिळाला. उत्कृष्ठ खेळाडू म्हणून मुंबई शहरच्या सोनल बच्चे यांची निवड झाली. या स्पर्धेचा समारोप शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे.

COMMENTS