पिंपळे सौदागर क्रीडांगणाचे उद्घाटन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पिंपळे सौदागर क्रीडांगणाचे उद्घाटन

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपळे सौदागर येथील अखिल भारतीय कबड्डी पंच स्व. बाळासाहेब बाजीराव कुंजीर क्रीडांगणाचे उद्घाटन तसेच पिंपर

गोवरचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी चोपडा नगरपालिका ॲक्शन मोड वरती
पवार व गडकरी म्हणजे देशाचे चमकते तारे : राज्यपाल कोश्यारींनी केला गौरव
जनताच त्यांना आडवे करतील ! ; मुख्यमंत्री शिंदे

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपळे सौदागर येथील अखिल भारतीय कबड्डी पंच स्व. बाळासाहेब बाजीराव कुंजीर क्रीडांगणाचे उद्घाटन तसेच पिंपरी-चिंचवड मनपा क्षेत्रात सीसीटीव्ही यंत्रणेचे भूमिपूजन करण्यात आले. श्री.पवार यांनी क्रीडांगणाची पाहणी करून माहिती घेतली. क्रीडांगणात मिनी फुटबॉल मैदान, क्रिकेट पिच, मैदानाभोवती चालण्याचा पथ आणि टेनिस कोर्ट तयार करण्यात आले आहे. स्पोर्ट्स कक्ष व स्टेडियम पद्धतीची बैठक आदी व्यवस्थाही करण्यात आली आहे. मनपा क्षेत्रातील सीसीटीव्ही यंत्रणेच्या कामाचा शुभारंभ पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागातर्फे ८८ चौकाकरीता २९७ सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्यात आले आहे. मनपाने २ हजार २०० कॅमेरे तर स्मार्ट सिटी अंतर्गत ४३० चौकाकरीता २०९३ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मनपा क्षेत्रात ७ हजार ६०० कॅमेरे कार्यान्वित होणार आहेत.

COMMENTS