Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेलापूर महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन

बेलापूर ः येथील कला व वाणिज्य महाविद्यालय मराठी विभाग, महाराष्ट्र शासन शिक्षण संचनालय उच्च शिक्षण आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संय

संत निरंकारी मिशनतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात
Ahmednagar : आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन | LOKNews24
Ahmednagar : नगरमध्ये मंदिरातील पुजारीच फैलावतात कोरोना (Video)

बेलापूर ः येथील कला व वाणिज्य महाविद्यालय मराठी विभाग, महाराष्ट्र शासन शिक्षण संचनालय उच्च शिक्षण आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन झाले. दिपप्रज्वलन व प्रतिमापुजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कालावधीत विविध पोस्टर्स आणि साहित्यिकांचे फोटो लावून महाविद्यालयाची सजावट करण्यात आली.

निबंधस्पर्धा,गीतगायन स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, शब्दकोडे व एकांकिका नाट्यवाचन, वाक्प्रचार व म्हणी, काव्यवाचन, चित्रपट समीक्षा, रांगोळी स्पर्धा, क्षेत्रभेट आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन राजेश खटोड यांनी भुषविले.उद्घाटक म्हणून अ‍ॅड.विजय साळुंके, बापुसाहेब पुजारी, संस्थेचे उपाध्यक्ष अशोकनाना साळुंके, पत्रकार नवनाथ कुताळ आदि मान्यवर उपस्थित होते. त्यांनी यावेळी आपली मराठी भाषा संवर्धनासाठीची आपली भुमिका मनोगतातून व्यक्त केली.कार्यक्रमाचे स्वागतपर प्रास्ताविक प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांनी केले. अध्यक्षीय सूचना प्रा.बाबासाहेब पवार यांनी मांडली. डॉ.संजय नवाळे यांनी अनुमोदन दिले. सुत्रसंचालन डॉ.मनोज तेलोरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. विठ्ठल लंगोटे यांनी केले. उद्घाटन कार्यक्रमाचा समारोप पुणे विद्यापीठ गीताने करण्यात आला.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

COMMENTS