Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रेनबो शैक्षणिक संकुलात जुनिअर कॉलेजचा शुभारंभ

कोपरगाव तालुका ः कोपरगाव तालुक्यात ज्यांना  शिक्षणाचा महामेरू म्हणून संबोधले जाते, त्या स्व. लहानुभाऊ नागरे  अण्णांच्या मुशीत तयार झालेले रेनबो श

जामखेड-सौताडा 548-डी राष्ट्रीय महामार्गाचे निकृष्ट काम
आमिषे दाखवून मतदारांना भुलवायचे आणि निवडणूक जिंकायची !
पदाधिकारी व अधिकारी दालनात सीसीटीव्ही बसवा

कोपरगाव तालुका ः कोपरगाव तालुक्यात ज्यांना  शिक्षणाचा महामेरू म्हणून संबोधले जाते, त्या स्व. लहानुभाऊ नागरे  अण्णांच्या मुशीत तयार झालेले रेनबो शैक्षणिक संकुल हे नाव आज कोपरगाव शहर व तालुक्याच्या पंचक्रोशीत घराघरात पोहोचलेले आहे याच रेनबो इंटरनॅशनल स्कूल, जेऊर कुंभारी या शाळेच्या निसर्गरम्य परिसरात  ग्रामीण भागातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांसाठी नव संजीवन ठरू पाहणार्‍या विश्‍वभारती रुरल एज्युकेशन सोसायटी संचलित, विश्‍वभारती कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय येणार्‍या नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या सेवेत दाखल होत आहे.
उच्चशिक्षित प्राध्यापक, आधुनिक प्रयोगशाळा, प्रदूषण मुक्त परिसर, केंद्रीय संगणकीय सुविधा, सुसज्ज सेमिनार हॉल, प्रशस्त लायब्ररी, स्मार्ट क्लासरूम, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, वायफाय कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, एक्सप्रेस फिडरसह पावर बॅकअप, स्पोर्ट्स सुविधा, विद्यार्थ्यांचा सुरक्षा विमा अशा अनेक सेवा सुविधांनी युक्त हे विश्‍वभारती  कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय स्पर्धेच्या युगात इतर महागड्या शैक्षणिक शुल्काच्या तुलनेत अत्यंत माफक शुल्कात विद्यार्थ्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल अग्रवाल, सचिव संजय नागरे, विश्‍वस्त मनोज अग्रवाल आनंद दगडे वनिता नागरे, आकाश नागरे, अविनाश शिरसाठ, नानासाहेब दवंगे, उपप्राचार्य निलेश औताडे, रवींद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवान व आदर्श विद्यार्थी घडवणारी उपक्रमशील शाळा म्हणून जिल्ह्यात रेनबो इंटरनॅशनल स्कूल या शाळेचा नवलौकिक आहे. एकाच छताखाली शिक्षणाची नवनवीन दालने उपलब्ध करून विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली व्हावीत, या हेतुने अतिशय प्रशस्त, प्रसन्न व आरोग्यदायी वातावरणात उभारलेले हे विश्‍वभारती कनिष्ठ महाविद्यालय आगामी काळात युवकांसाठी वरदान ठरणार आहे. तरी बहुसंख्य पालकांनी आपल्या पाल्यांचा विविध शाखांमध्ये प्रवेश घेऊन त्यांचे उज्ज्वल करियर घडवावे व या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आकाश नागरे यांनी पालकांना व विद्यार्थ्यांना केलेले आहे.

COMMENTS