बीड प्रतिनिधी - बीड जिल्हा रुग्णालयात गेल्या अनेक दिवसापासून रुग्णसेवेच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या उपाययोजना जिल्हा रुग्णाल्यात राबविल्या जातात
बीड प्रतिनिधी – बीड जिल्हा रुग्णालयात गेल्या अनेक दिवसापासून रुग्णसेवेच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या उपाययोजना जिल्हा रुग्णाल्यात राबविल्या जातात सातत्याने केल्या जातात. जिल्हाभरातील रुग्णांसाठी सोनोग्राफी, एक्स-रे, सिटीस्कॅन, च्या माध्यमातून रुग्णांवर निदान होण्यासाठी या सुविधा आहेत. मात्र आता नव्याने जिल्हा रुग्णालयात हृदयरोग तपासणी म्हणजे 2ऊ इको, ट्रेस टेस्ट मुळे अनेक रुग्णांचा फायदा होणार आहे, हृदयरोग असणार्या रुग्णांवर टू डी इको मुळे निदान होण्यास मदत होणार आहे आज या स्वतंत्र कक्षाचे उद्घाटन क्रमांक वॉर्ड सहा मध्ये पार पडले.
गेल्या अनेक दिवसापासून बीड जिल्हा रुग्णालयात वेगवेगळ्या माध्यमातून रुग्णसेवेच्या दृष्टीकोनातून बारकाईने लक्ष दिले जाते. ज्या वस्तू जिल्हा रुग्णात नाहीत अशा सर्व वस्तू जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून रुग्णसेवा सुरळीत करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असणारे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे व यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालयातील सर्वच टीम ऋण सेवा देताना सध्या दिसून येत आहे. जिल्हा रुग्णालयाच्या वार्ड क्रमांक सहा मध्ये आज या टू डी इको, ट्रेस टेस्ट च्या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी जिल्हा चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे, आर एम ओ डॉक्टर नागेश चव्हाण, फिजिशियन डॉक्टर संजय राऊत, डॉक्टर कोटेचा, डॉक्टर मुळे, मुख्य आधीसेविका रमा गिरी, पत्रकार संजय मालानी, पत्रकार व्यंकटेश वैष्णव, संपादक जालिंदर धांडे,ळसंगीता महानवर , धांडे अनिता,शीला मुंडे, वंदना राजपूत, खरमाटे अनिता, यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
COMMENTS