Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नेवाशातील गुरुद्वारा नूतनीकरणाचे आमदार गडाखांच्या हस्ते लोकार्पण.

कृतीशील कार्याबद्दल शीख पंजाबी बांधवांच्या वतीने गौरव

नेवासाफाटा ः नेवासा येथील गुरुद्वाराच्या सुशोभिकरण व  नूतनीकरण कामाचे लोकार्पण नेवासा तालुक्याचे आमदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते करण्यात आले.याव

नगरच्या एमआयडीसी परिसरातही हनी ट्रॅप l DAINIK LOKMNTHAN
परदेशातून येणार्‍या प्रवाशांना सक्तीचं क्वारंटाईन | DAINIK LOKMNTHAN
sangamner – संगमनेर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी आरिफ देशमुख यांची निवड l LokNews24

नेवासाफाटा ः नेवासा येथील गुरुद्वाराच्या सुशोभिकरण व  नूतनीकरण कामाचे लोकार्पण नेवासा तालुक्याचे आमदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी लाखो रुपयांचा निधी मंजूर करून आणल्याबद्दल आमदार गडाख यांचा येथील शीख पंजाबी बांधवांच्या वतीने सत्काराच्याद्वारे त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
   नेवासा येथील गुरुद्वारामध्ये झालेल्या कार्यक्रम प्रसंगी नेवासा बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील,नगराध्यक्ष सतीश पिंपळे, लक्ष्मणराव जगताप,दलित बहुजन समाजाचे नेते अशोक गायकवाड, अ‍ॅड. काकासाहेब गायके, संजय सुखदान, हिरामण धोत्रे, नारायण लोखंडे, नगरसेवक संदीप बेहळे, जयदीप जामदार यावेळी उपस्थित होते. यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी सुशोभिकरण कामाच्या कोनशिलाचे अनावरण आमदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते करण्यात आले. गुरुद्वाराचे व्यवस्थापक ज्ञानी किशोरसिंग यांनी गुरुवाणी म्हटली.गुरुद्वारा मार्गदर्शक प्रेमचंद विखोना यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले तर अजितसिंह नरुला यांनी प्रास्ताविक करत आमदार गडाख यांनी दिलेला शब्द पाळून गुरुद्वाराला निधी मंजूर करून सुशोभिकरणाचे काम मार्गी लावल्याबद्दल शीख पंजाबी बांधवांच्या वतीने धन्यवाद दिले. यावेळी बोलताना आमदार गडाख पुढे म्हणाले की, गुरुद्वाराच्या सुशोभीकरणासाठी मला सेवा करता आली हे मी माझे भाग्य समजतो,तीर्थक्षेत्र विकास निधीतून मला हे काम करता आहे भविष्यात ही गुरुद्वारात येणार्‍या भाविकांसाठी  इतर सुविधा कशा देता येईल यासाठी मी लक्ष घालेन अशी ग्वाही उपस्थित शीख पंजाबी बांधवांना यावेळी बोलताना दिली. यावेळी आमदार शंकरराव गडाख यांनी दिलेला शब्द पाळून कृतिशील कामाच्या माध्यमातून सुशोभिकरण पूर्ण केल्या बद्दल गुरुद्वाराचे रूप पालटले होते.आमदार शंकरराव गडाख यांच्या कृतिशील कार्याचा गौरव गुरुद्वाराचे सेवेकरी ज्ञानी किशोरसिंग व उपस्थित बांधवांच्या हस्ते सत्कार करून करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्वधर्मीय नागरिकांना लंगर (प्रसादाचे) वाटप करण्यात आले. पत्रकार सुधीर चव्हाण यांनी आभार मानले.

COMMENTS