अहमदनगर/प्रतिनिधी ः सर्व दैनंदिन नित्य उपयोगी वस्तू एकाच छत्राखाली व सर्वात स्वस्त किमतीत मिळण्यासाठी देशात प्रसिद्ध असलेल्या डी मार्ट या सुपर शॉ
अहमदनगर/प्रतिनिधी ः सर्व दैनंदिन नित्य उपयोगी वस्तू एकाच छत्राखाली व सर्वात स्वस्त किमतीत मिळण्यासाठी देशात प्रसिद्ध असलेल्या डी मार्ट या सुपर शॉपी मॉलचे नगर मध्ये उद्घाटन झाले आहे. सावेडी येथे उभारण्यात आलेल्या भव्य डी मार्ट मॉलचे बुधवारी उद्घाटन झाले. या मॉलसाठी जागा देणार्यांच्या उपस्थिती हा उद्घाटन सोहळा झाला.
उद्योजक ब्रिजमोहन बक्षी यांच्या हस्ते फीत कापून व नारळ वाढवून शेरावाली मातेच्या जयजयकारात उद्घाटन झाले. यावेळी प्रकाश मेहता, हितेश ओबेरॉय, रवी अॅबट, रवी बक्षी, अनिल अॅबट, मानव अॅबट, हरीश अॅबट, राजेश मेहता, श्रीरंग मेहता, कौशल मेहता, वीरेंद्र ओबेरॉय, प्रतिक मेहता, पार्थ मेहता आदींसह डी मार्टचे व्यवस्थापक अधिकारी उपस्थित होते. यावेळी ब्रिजमोहन बक्षी म्हणाले, देशात नावाजलेल्या डी मार्ट सारखा उच्च दर्जाचा मॉल नगरमध्ये सुरु झाला हे समाधानकारक आहे. सध्याच्या महागाईच्या काळात नागरिकांना सर्वात स्वस्त दरात नित्य उपयोगी वस्तू येथे उपलब्ध होणार असल्याने नागरिकांना हा मोठा दिलासा आहे. नगरच्या सर्व नागरिकांनी या डी मार्ट मॉलचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
COMMENTS