Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरपालिका शाळेत संगणक कक्षाचे उद्घाटन

शिक्षिका सुनिता इंगळे यांचे आ.आशुतोष काळे व मुख्याधिकारी गोसावींनी केले कौतुक

कोपरगांव प्रतिनिधी ःकोपरगाव नगरपालिका शाळा क्र.6  येथे शाळेतील संगणक कक्षाचे उद्घाटन नुकतेच आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते तर नगरपालिकेचे मुख्या

मनरेगाकडून 2.30 कोटी निधी मंजूर ः आ. आशुतोष काळे
चापडगावमध्ये धनगर आरक्षण आंदोलन पेटले
जेजुरीत दारूड्या मुलाने वडिलांवर केले कोयत्याने वार | LokNews24

कोपरगांव प्रतिनिधी ःकोपरगाव नगरपालिका शाळा क्र.6  येथे शाळेतील संगणक कक्षाचे उद्घाटन नुकतेच आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते तर नगरपालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
  शाळेतील उपक्रमशील,कृतीशील शिक्षिका सुनिता इंगळे यांच्या अथक प्रयत्नातून शाळेला आठ संगणक असणारी संगणक लॅब बक्षिस स्वरुपात जिल्हा परीषद अहमदनगर व अ‍ॅमेझान फ्युचर इंजिनिअर, एल.एफ.ई. संस्थेमार्फत यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन कोर्सच्या माध्यमातून मिळाली. या संगणक कक्षाचे उद्घाटन कोपरगाव तालुक्याचे  आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते तर नगरपालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या प्रमुख उपस्थीतीत पार पडले. संगणक कक्ष उभारताना आलेल्या प्रसंगावर आधारीत यशोगाथा उपस्थितीत मान्यवरांना दाखविण्यात आली.यावेळी कार्यक्रमासाठी जनार्दन फुलारे,चाकणे ,एम.के.आढाव विद्यालयाच्या मुख्याध्यापिका भावना खैरनार,नपा. शाळा क्र.3 च्या मुख्याध्यापिका निर्मला बनसोडे, नपा.शाळा क्र.5’चे मुख्याध्यापक विलास माळी,शिक्षक माणिक कदम,सुनिल राहाणे,अर्जुन शिरसाठ, अमोल कडू,सनी गायकर,गोपाल कोळी,प्रताप वळवी,अमित पराई,रंजना खैरनार,विमल वाणी,संतोष जाधव,कल्पना बच्छाव,पत्रकार, पालक,शिक्षक व विद्यार्थी  मोठ्या संख्येने उपस्थित होते. संगणक कक्ष उभारणीसाठी नगरपालिका मुख्याध्याकारी शांताराम गोसावी यांची साथ लाभली. त्यांनी वेळोवेळी केलेल्या मदतीमुळे सुसज्ज संगणक कक्ष शालेय विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी लवकर उभा राहिला. हा संगणक कक्ष तयार करण्यासाठी  शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना निंबाळकर,सविता साळुंके,आरती कोरडकर,अरुण पगारे यांनी खूप मेहनत घेतली.तसेच मिशन आपुलकी अंतर्गत जाधव,दिलीप बर्डे,मधुमिता निळेकर,दिपक साळवे, पायल पवार,सपना शर्मा,अष्टविनायक प्रतिष्ठान,नगरसेवक विरेन बोरावके,कोळपकर स्टील भांडारचे मालक,यशश्री बँगल्स दुकानाचे मालक कोळपकर,आरती कोरडकर व नवनाथ सूर्यवंशी  यांनी मदत केली. संगणक कक्ष उभारणीबद्दद प्रशासनाधिकारी राजेश डामसे यांनी अभिनंदन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका कल्पना निंबाळकर तर आभार सविता साळुंके यांनी मानले.

-नगरपालिका शाळा क्र.6 च्या शिक्षिका सुनिता इंगळे यांनी केलेल्या आनलाईन कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी मिळवलेले आठ संगणक म्हणजे शैक्षणिक क्षेत्रातील निश्‍चितच मोठे योगदान आहे.याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो.या संगणक कक्षाचा उपयोग विद्यार्थी गुणवत्तावाढीसाठी होऊन या माध्यमातून  गोरगरीब विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणे सहज शक्य होणार आहे.-आ. आशुतोष काळे

-प्राथमिक विभागापासून सर्व विद्यार्थ्यांना मिळणार्‍या संगणक शिक्षणामुळे विद्यार्थी शाळेच्या प्रवाहात टिकून राहण्यास मदत होऊन गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल.शिक्षिका सुनिता इंगळे यांच्या प्रयत्नातून नगरपालिका शाळेत उभा राहिलेला सुसज्ज संगणक कक्ष विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी उपयुक्त ठरेल. – शांताराम गोसावी. मुख्याधिकारी, कोपरगाव नगरपालिका.

COMMENTS