Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विवाह संस्कृती परिवारातर्फे ‘शोध ‘ती’ कार्यक्रमात डॉ. प्रितेश जुनागडे यांनी साधला संवाद

जीवनशैलीतील बदलांनी शरीरात राखा रक्ताचे योग्य प्रमाण

नाशिक ः शरीरात लोह कमी असणे, जीवनसत्वे ब-१२ (व्हिटॅमिन बी१२), ड जीवनसत्व (व्हिटॅमिन डी) यांच्या कमतरतेमुळे सामान्यतः शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी

मराठवाड्यात उष्माघाताचा पहिला बळी
आनंदाचा शिध्याचं अखेर ठरलं ; जिल्ह्यातील सात लाख ८२ हजार कुटुंबांना मिळणार लाभ
गाढे पिंपळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय पोषण आहारात अनियमितता

नाशिक ः शरीरात लोह कमी असणे, जीवनसत्वे ब-१२ (व्हिटॅमिन बी१२), ड जीवनसत्व (व्हिटॅमिन डी) यांच्या कमतरतेमुळे सामान्यतः शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी अधिक होते. परंतु हे प्रमाण शोधण्यासाठी केल्या जाणाऱ्या चाचण्यांना येणाऱ्या खर्चापेक्षा कमीमध्ये त्यावरील उपचार केला जाऊ शकतो. आहारात बदल करतांना, कोवळे उन घेत ही कमतरता भरुन काढता येऊ शकते, असे प्रतिपादन लोटस हॉस्पिटलचे संचालक रक्तविकार तज्ज्ञ डॉ.प्रितेश जुनागडे यांनी केले.

अखिल भारतीय विवाह संस्कृती परिवारातर्फे आयोजित ‘‘शोध ‘ती’चा’’ कार्यक्रमात डॉ. जुनागडे बोलत होते. खुटवडनगर येथील माहेरघर मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर विवाह संस्कृती परिवाराच्या अध्यक्षा रेखा कोतकर, रत्नमाला राणे, चित्रा कोठावदे, मिनल वाणी,सौ.रत्नाताई कोठावदे,अलकाताई सोनजे, उषा कोठावदे,योगीता कोठावदे ,सुनिता बाविस्कर व श्री. अतुल जी वाणी,प्रविणजी वाणी,विवेकजी महाजन, विनोद जी  दशपुते, मधुकरजी  ब्राह्मणकर, गीतांजली वरखेडे,नेहा कोठावदे,श्वेता बधान, डॉ रुपाली पाखले, रोहिणी कोठावदे,स्नेहा नेरकर, मालती ब्राह्मणकर, परेश अम्रुतकर ,कल्पेशजी दुसे,सुभाषजी देव,प्रभाकरजी कोठावदे,जितेद्रजी कोठावदे, जितेद्रजी येवले,विवाह संस्क्रुती परिवार उपस्थित होते.

डॉ.जुनागडे म्हणाले, की आपण रोज भेटत असलेल्या व्यक्तींचे सामान्य निरीक्षण करुन रक्ताच्या कमतरतेचा अंदाज लावू शकतो. डोळे पांढरे पडणे, हात पांढरे पडणे अशी काही निरीक्षणे नोंदविता येतात. गंभीर स्वरुपाचे रक्ताचे विकार असतील तर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच उपचार घेतले पाहिजे. तर रक्ताची कमतरतेच्या समस्येवर उपचार म्हणून जीवनशैलीत बदल आवश्यक ठरतो. यामध्ये आहारातून शरीराला आवश्यक जीवनसत्वे प्राप्त करुन घेता येतात. याशिवाय ड जीवनसत्वासाठी उगवत्या सुर्याचे कोवळे उन हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. या कार्यक्रमातून डॉ. प्रितेश जुनागडे यांनी ’रक्तविकार : आहार आणि उपचार’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.

रक्तवाढीसाठी नैसर्गिक आहार घ्या– रक्तधातू सशक्त बनवण्यासाठी किंवा रक्तवाढीसाठी नैसर्गिक आहार व औषधांचा वापर करणे सर्वांत चांगले. काळ्या मनुका, खजूर, डाळिंब, सफरचंद, शेपूपालक, केशर, आवळा, गूळ,शेंगदाणे वगैरे गोष्टींचा आहारात नियमित समावेश असण्याने रक्ताचे नीट पोषण होऊ शकते.

स्त्रीशक्तीचा सन्मान – कार्यक्रमात शहरात विभागीय मंडळाशी संलग्न राहून समाजकार्य करणार्‍या महिला मंडळाच्या अध्यक्षांना सन्मानित करण्यात आले. पारंपरिक चौकटीच्या बाहेर जाऊन विशेष कार्य करून नावलौकीक मिळविलेल्या महिलांचा गौरव यावेळी केला.डॉ हेतल कासलीवाल यांचा संघर्षमय प्रवास ऐकून संपूर्ण सभागृह भारावून गेले. आधुनिक विवाह आणि पारंपारिक विवाह पध्दतीवर भाष्य करणारे ‘विवाह संस्कार’, मुला-मुलींच्या संस्कार हस्तक्षेप थांबविण्यासाठी संदेश देणारे ‘लुटबुड’ नाटीका सादर करीत समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न यातून झाला.

COMMENTS