Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात पुढील दोन दिवस गारठा वाढणार

विदर्भात पारा 10 अंशांच्या खाली

पुणे ः उत्तर भारतातून येणारे थंड वारे मध्य प्रदेशावरून जाऊन ते नॉर्थ ईस्टर्न वरून महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 48 तासात किमान

मुर्शिदाबादमध्ये 10 नवजात अर्भकांचा मृत्यू
Aditya Thakarey : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची मोठी घोषणा | LOKNews24
बीआरएस च्या आमदार लस्या नंदिता यांचा रस्ता अपघातात मृत्यू

पुणे ः उत्तर भारतातून येणारे थंड वारे मध्य प्रदेशावरून जाऊन ते नॉर्थ ईस्टर्न वरून महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 48 तासात किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. बुधवारी महाराष्ट्रात काही भागात तापमान 10 अंशांच्या खाली गेले आहे. विदर्भात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून यवतमाळमध्ये 8.7 तर नागपूरमध्ये 9.8 अंश तापमानाची नोंद झाली आहे.
राज्यात पुढील दोन दिवस थंडी वाढणार आहे. पुण्यात आणि मुंबईत तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात थंडी वाढणार असून ख्रिसमसमध्ये तापमान वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे राज्यात पुढील पाच ते सात दिवस हवामान कोरडे राहील. उत्तरेकडून येणार्‍या थंड वार्‍यांमुळे 48 तासांमध्ये किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. परिणामी थंडीचा कडाका वाढणार आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भात थंडी वाढणार आहे. पुण्यात देखील पुढील दोन दिवस तापमानात घट होणार आहे.  उत्तर भारतात आलेल्या थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढला आहे. महाराष्ट्रात काही भागात तापमान 10 अंशांच्या खाली गेले आहे. विदर्भात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून यवतमाळ मध्ये 8.7 तर चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वाशिम जिल्ह्यांचा पारा 10 अंशाच्या खाली गेला आहे. 15 डिसेंबरनंतर थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. सध्या आकाश निरभ्र आहे. त्यामुळे तापमानात कमालीची घट झाली आहे. हवेतील गारठा वाढला आहे. राज्यातील किमान तापमान सरासरीच्या जवळपास असून काही ठिकाणी 1 ते 5 अंशांची घट झाली आहे. मुंबई, नवी मुंबई, पुणे, जळगाव, सातारा या भागातही तापमानात मोठी घट झाली आहे. नागपूरमध्येही किमान तापमान 10 अंशांच्या खाली गेल्यामुळे थंडी वाढली आहे.

COMMENTS