नांदेड प्रतिनिधी - शासन निर्णयानुसार दिव्यांग व्यक्तींना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगाच्या दारी हा उपक्
नांदेड प्रतिनिधी – शासन निर्णयानुसार दिव्यांग व्यक्तींना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगाच्या दारी हा उपक्रम हाती घेतला आहे. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड हद्दीतील सहा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत मा.आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या आदेशाने, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त निलेश सुंकेवार यांच्या नियंत्रणाखाली दिव्यांगा साठी सर्वेक्षणाची सुरुवात करण्यात आली असुन शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयात दिव्यांग व्यक्ती शासनाच्या योजनेपासून वंचित राहू नये म्हणून त्यांचे सर्वेक्षण करणे आवश्यक असल्याने क्षेत्रीय कार्यालयातील वसुली लिपिकामार्फत दिव्यांग व्यक्तीची माहिती प्रपत्रानुसार भरून घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दिव्यांगाना शासनाच्या योजनेत सहज, सुलभ संपर्क साधता यावा ,अनेक दिव्यांगा कडे काही प्रमाणपत्रे कमी असतील, काही प्रमाणपत्रातील असलेल्या त्रुटींची पूर्तता करून त्या त्रुटी दुर व्हाव्यात व शासनाच्या योजना दिव्यांगा पर्यंत पोहचण्यासाठी हे अभियान मोलाचे ठरणार आहे. क्षेत्रीय कार्यालयात सर्वेक्षणाची माहिती संकलित करून दिव्यांग कक्षा दाखल कराण्यात येणार आहे. शहरातील सर्व दिव्यांग बांधवानी आपली संपुर्ण अचुक माहिती प्रपत्रात भरुन महापालिकेच्या कर्मचारी यांच्या कडे द्यावी असे आवाहन उपायुक्त( दिव्यांग विभाग) निलेश सुंकेवार यांनी केले आहे.असे सहाय्यक आयुक्त सुधीर इंगोले यांची प्रसिद्धी पत्रकावर स्वाक्षरी आहे.
COMMENTS