मुंबई ः विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी सकाळी विधानसभेच्या 274 आमदारांनी मतदान केले होते. 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यामु
मुंबई ः विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी सकाळी विधानसभेच्या 274 आमदारांनी मतदान केले होते. 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यामुळे कोणत्या पक्षाचे आमदार क्रॉस व्होटिंग करतात, यावर चर्चा रंगत असतांना, भाजपने आपले 5 ही आमदार निवडून आणले तर, दुसरीकडे शिंदे यांच्या शिवसेनेने 2 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 2 जागा जिंकत महायुतीने विधानपरिषदेत आपला वरचष्मा कायम ठेवला आहे. तर काँगे्रस आणि ठाकरे गटाच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा विजय झाला आहे. मात्र शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. त्यांना खासदार शरद पवार यांच्या पक्षाने पाठिंबा दिला होता. अतिशय चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत भाजपच्या पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, योगेश टिळेकर आणि सदाभाऊ खोत विजयी झाले आहेत. तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँगे्रसकडून शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर दोघेही विजयी झाले आहेत. शिंदे यांच्या शिवसेनेकडून भावना गवळी अणि कृपाल तुमाने यांनी विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे काँगे्रसच्या प्रज्ञा सातव आणि ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांनी विजय मिळवला आहे. या निवडणुकीत मात्र शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांना पराभवाची चव चाखावी लागली आहे. या निवडणुकीत काँगे्रसच्या आमदारांची मते फुटल्याचा दावा करण्यात येत आहे.
पंकजा मुंडे यांना विजयासाठी आवश्यक असणार्या 23 मतांपेक्षा 3 मते जास्त पडली. त्यांना 26 मते मिळालीत. तर परिणय फुके यांनी 23 मतांचा कोटा पूर्ण केला. भाजपच्या योगेश टिळेकरांचा पहिला विजय झाला आहे. त्यांना विजयासाठी निश्चित करण्यात आलेली 23 मते मिळाली. भाजप उमेदवार सदाभाऊ खोत यांचाही विधानपरिषद निवडणुकीत विजय झाला आहे. त्यांना 26 मते म्हणजे विजयासाठी आवश्यक असणार्या 23 मतांपेक्षा 2 मते जास्त मिळाली. भाजपचे सर्वच 5 उमेदवार विजयी झालेत. समान पसंतीक्रम नोंदवल्यामुळे 1 मत बाद झाले आहे. प्राधान्यक्रम सारखाच नोंदवल्याने हे मत बाद झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर व शिवाजीराव गर्जे हे दोन्ही उमेदवार विजयी झालेत. विशेषतः गर्जे हे 1 अतिरिक्त मत घेऊन विजयी झालेत. त्यांना 24 मते मिळाली आहेत. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा विजय झाला. त्यांना विजयासाठी निश्चित करण्यात आलेल्या 23 मतांच्या कोट्यापेक्षा 2 मते जास्त मिळाली. त्यांना 25 मते मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे भावना गवळी व कृपाल तुमाणे हे दोन्ही उमेदवार विजयी झालेत. भावना गवळी यांना 1, तर तुमाणे यांना 2 अतिरिक्त मते मिळाली.
नार्वेकर आणि जयंत पाटलांत होती चुरस – महायुतीचे 9 आणि काँगे्रसचा एक उमेदवार विजयी झाल्यानंतर 11 व्या जागेसाठी ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि खासदार शरद पवार पुरस्कृत शेकापचे जयंत पाटील यांच्यात जोरदार चुरस निर्माण झाली होती. मात्र नार्वेकर यांनी विजय मिळवत शेकाचे जयंत पाटील यांचा पराभव केला आहे. मात्र या निवडणुकीत जयंत पाटील यांना मते मिळाली नसून, खासदार शरद पवार यांच्या आणि काँगे्रसची मते फुटल्याचे दिसून येत आहे.
आम्हाला पाच मते अधिक मिळाली : उपमुख्यमंत्री पवार – विधानपरिषद निवडणुकीत आमच्याकडे 42 मते होती. विजयासाठी आम्हाला 4 अतिरिक्त चार मतांची आवश्यकता होती. मात्र आम्हाला 47 मते मिळाली आहेत. आम्हाला अधिकची 5 मते मिळाली. त्यांचे आभार मानतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार या निवडणुकीनंतर माध्यमांशी बोलतांना म्हणाले.
COMMENTS