Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरीला वेग

भाजप खासदार ब्रिजेंद्र सिंहाचा काँगे्रसमध्ये प्रवेश

नवी दिल्ली/मुंबई ः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बंडखोरीला वेग आल्याचे दिसून येत आहे. भाजपमधून काँगे्रसमध्ये प्रवेश करणार्‍यांची संख्या कमी

सगळ्या निवडणूक प्रक्रियेची थट्टा करून टाकली आहे… राज ठाकरेंचा घणाघात
पुणे विद्यापीठाच्या बनावट पदवी प्रमाणपत्राद्वारे मिळवली नोकरी
शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार ? l Lok News24

नवी दिल्ली/मुंबई ः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बंडखोरीला वेग आल्याचे दिसून येत आहे. भाजपमधून काँगे्रसमध्ये प्रवेश करणार्‍यांची संख्या कमी असली तरी, रविवारी प्रथमच भाजपच्या ब्रिजेंद्र सिंह या खासदाराने भाजपला सोडचिठ्ठी देत काँगे्रसमध्ये प्रवेश केला. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे आमदार यांनी देखील शिंदेंच्या शिवसेनेमध्ये अधिकृत प्रवेश करण्यावर शिक्कामोर्तब केल्याचे दिसून येत आहे.
काँगे्रसमधून भाजपमध्ये जाणार्‍यांची संख्या मोठी असली तरी, भाजपमधून काँगे्रसमध्ये प्रवेश करणार्‍यांची संख्या नगण्यच आहे. ब्रिजेंद्र सिंह यांचे खासदारकीचे तिकीट कापले जाणार असल्यामुळे त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचे बोलले जात आहे. हरियाणाच्या हिसारचे भाजपा खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. काही राजकीय कारणास्तव भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे ब्रिजेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. ब्रिजेंद्र सिंह यांनी राजीनामा दिल्यामुळे हिसारमध्ये भाजपला ऐन निवडणुकीच्या तोंडावरच खिंडार पडले आहे. भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देताना ब्रिजेंद्र सिंह यांनी भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. माजी केंद्रीय मंत्री बीरेंद्र सिंह यांचे ब्रिजेंद्र सिंह हे पुत्र आहेत. ते हिसार लोकसभा मतदारसंघातून खासदार होते. ब्रिजेंद्र सिंह यांनी भाजप का सोडली, याबाबत त्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, आपण राजकीय कारणास्तव भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून ब्रिजेंद्र सिंह हे भाजपवर नाराज असल्याचेही बोलले जात होते. भाजपचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच ब्रिजेंद्र सिंह यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी जाऊन ब्रिजेंद्र सिंह आणि माजी केंद्रीय मंत्री बिरेंद्र सिंह यांनी काही वेळ चर्चा केली. या चर्चेनंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. ब्रिजेंद्र सिंह यांना भाजपाकडून लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे त्यांनी भाजपाला रामराम केल्याची चर्चा आहे. तर ब्रिजेंद्र सिंहांना आता काँग्रेसकडून लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आमदार वायकर शिंदेंच्या शिवसेनेत ! – ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्यावर शिक्कामोर्तब केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर जाहीर प्रवेश सोहळा होणार असून, त्यात वायकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. रवींद्र वायकर यांच्यावर जोगेश्‍वरीतील कथित घोटाळ्याचे आरोप आहेत. त्यांची ईडीची चौकशीही सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी ट्वीट करुन, रवींद्र वायकरांना ईडी धमकावत असल्याचे म्हटले होते. तसेच, रवींद्र वायकरांना शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी दबाव असल्याचेही संजय राऊतांनी म्हटले होते. अशातच आता थेट रवींद्र वायकरांच्या शिंदेेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समोर आले आहे.

COMMENTS