Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मविआत बिघाडीच्या दिशेने

राष्ट्रवादीने आघाडीतून बाहेर पडावे का? भुजबळांचा राऊतांना संतप्त सवा

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे दिसून येत असून, राष्ट्रवादी काँगे्रस आणि ठाकरे गटामध्ये धुसफूस वाढल्याचे द

मध्यप्रदेशात मंदिराचे छत कोसळून 13 भाविकांचा मृत्यू
कालिका फर्निचरच्या ग्राहकांना विमा संरक्षणाचा लाभ
रवींद्र वायकर डरपोक ः संजय राऊतांची टीका

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे दिसून येत असून, राष्ट्रवादी काँगे्रस आणि ठाकरे गटामध्ये धुसफूस वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी बिघाडीच्या दिशेने एक-एक पाऊल टाकतांना दिसून येत आहे. सोमवारी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एका लेखातून राष्ट्रवादी काँगे्रस आणि शरद पवारांचा चांगलाच समाचार घेत बोचरी टीका केली आहे. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँगे्रसचे आता आघाडीतून बाहेर पडावे का ? असा संतप्त सवाल छगन भुजबळ यांनी संजय राऊतांना केला असल्याचे दिसून येत आहे.
शरद पवार यांनी लोक माझे सांगाती या पुस्तकात जे काही म्हटले आहे, त्यावर उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्टीकरण दिले आहे. मला महाविकास आघाडीत बिघाडी करायची नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. मग संजय राऊत यांना हे सगळे उकरून काढायची काय गरज आहे, असा  सवाल भुजबळांनी उपस्थित केला आहे. पुढे बोलतांना भुजबळ म्हणाले की, मला महाविकास आघाडीत बिघाडी करायची नाही असे उद्धव ठकारे यांनी म्हटले आहे. मग संजय राऊत यांना हे सगळे उकरून काढायची काय गरज आहे. त्यांना काय अडचण आहे. त्यांना असे वाटते का की राष्ट्रवादीने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे? मनभेद निर्माण व्हावेत. राऊत यांचे जेवढं आयुष्य आहे तेवढा शरद पवार यांचा राजकीय अनुभव आहे, असे भुजबळ यांनी म्हटले आहे. दरम्यान संजय राऊत यांनी इतके लक्ष शिंदे ग्रुप आणि त्यांच्या बॅगांवर ठेवले असते तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. राष्ट्रवादीमध्ये सुद्धा अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील असे अनेकजण नेतृत्व करण्यास सक्षम असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

COMMENTS