Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवनी येथील घरफोडी प्रकरणी गुन्हेगारास मुद्देमालासह अटक

इस्लापूर प्रतिनिधी - पोलीस स्टेशन इस्लापूर येथील दि. 26 मार्च 23 रोजी फिर्यादी संतोष दिलीप कोटलवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन इस्लाप

राहुरी तहसीलवर मातंग समाजाचा आक्रोश मोर्चा
वळवाच्या तडाख्याने फुटलेल्या द्राक्षांच्या घडावर मधमाशांचा हल्ला
बसमध्ये चढताना तोल गेल्याने वृद्धेचा मृत्यू

इस्लापूर प्रतिनिधी – पोलीस स्टेशन इस्लापूर येथील दि. 26 मार्च 23 रोजी फिर्यादी संतोष दिलीप कोटलवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन इस्लापूर येथे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 29 / 2023 कलम 457, 380 भादवी अन्वये अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल होता .सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपी निष्पन्न करणे बाबत  पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे यांनी आदेशित केले होते, त्या संबंधाने सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे आरोपी नामे शेख समीर शेख सलीम, वय 24 वर्षे रा. शिवणी तालुका किनवट जिल्हा नांदेड यास ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या संबंधाने सखोल विचारपूस केली असता आरोपीने गुन्हा केल्याचे कबूल करून गुन्ह्यांमध्ये गेलेला माल 75 ग्राम सोन्याचे गंठण किंमत अंदाजे तीन लाख 70 हजार रुपयाचा मुद्देमाल आरोपीकडून हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला आहे . सदरची कामगिरी  श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधीक्षक नांदेड श्री खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक, विजय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग किनवट. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन इस्लापूर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे पोलीस उपनिरीक्षक भारत सावंत पोलीस कॉन्स्टेबल संदीप साळवे पोलीस कॉ./ 444 शिवाजी साखरे पोलीस कॉ./ 1006 अरुण मडावी चालक पोलीस अजमोइ दिन यांनी पार पाडले आहे .पुढील तपासण्यासाठी आरोपीला  पोलीस उपनिरीक्षक भारत सावंत यांनी किनवट न्यायालयात हजर केले आहे.

COMMENTS