Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सासवडमध्ये शिर्डीतील भाविकांकडून पुरणपोळी आमरसाची वारकर्‍यांना पंगत

शिर्डी प्रतिनिधी ः घुमे मंदिरात मृदुंगाची थाप,टाळ चिपळ्यांच्या संग ..वारकरी विठू नामात दंग.. मनी तेही माझ्या विठू मायबाप अशा भक्तीभाव वातावरणात ह

शहरी भागातील शिक्षकांनी जाणून घेतले दिल्ली मॉडेल
बंद केलेले पाणी टँकर पुन्हा चालू करा
वंचितांना ऊबदार ब्लँकेट, कपडे व फराळचे वाटप

शिर्डी प्रतिनिधी ः घुमे मंदिरात मृदुंगाची थाप,टाळ चिपळ्यांच्या संग ..वारकरी विठू नामात दंग.. मनी तेही माझ्या विठू मायबाप अशा भक्तीभाव वातावरणात ह भ प केंद्रे महाराज आळंदी येथील दिंडी सोहळा पंढरपूर जात असताना सासवड मध्ये शिर्डीतील निस्वार्थ साईसेवक, समाजसेवक योगेश शेठ थिय्या यांनी सालाबाद प्रमाणे आषाढी एकादशी निमित्त माऊलीच्या दिंडीला सासवड येथे महाप्रसादाचे आयोजन केले तिय्या कुटुंबाच्या वतीने करण्यात आले होते. ह.भ.प. केंद्रे महाराज आळंदी यांच्या दिंडी श्री क्षेत्र पंढरपूर येथे जाणार्‍या हजारो वारकरी विठ्ठल भक्तांना पुरणपोळी मांडे व आमरस जेवणाच्या मेजवानीचा प्रसादाची पंगत देण्यात आली होती. तिय्या कुटुंबांनी सालाबाद प्रमाणे याही वर्षी आमरस व पुरणपोळी मांडे अश्या खमंग मेजवानी चा प्रसाद हजारो वारकरी,माऊली भक्तांना देण्यात आला. याप्रसंगी योगेश शेठ थिय्या म्हणाले की, मागील आठ वर्षापासून हा अन्नदानाचा उपक्रम राबविला जातो. माऊलींनी मला साक्षात वारकर्‍यांची सेवा करण्याचे भाग्य लाभले. आजचे हे 9 वे वर्ष आसून मी आजीवन ही पंगत देणार असून वारकर्‍यांची सेवा करणार. अन्नदान सर्वश्रेष्ठ दान असा हा साईबाबांचा संदेश जपत शिर्डीतील साई सेवकांनी केलेले हे कार्य सदैव समाजासाठी प्रेरणा देणारा ठरेल असे योगेश शेठ थिय्या यांनी सांगितले.

COMMENTS