Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेर मध्ये फॉरेस्ट अधिकाऱ्यांची मक्तेदारी कर्मचाऱ्यास कामावर येण्यास मज्जाव 

अहमदनगर प्रतिनिधी -  संगमनेर फॅरिसट विभागातील संगमनेर विभागातील फॉरेस्ट अधिकाऱ्यांची मक्तेदारी बघायला मिळत आहे फॉरेस्ट रेंज अधिकारी  सागर माळी यांनी

जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायती व 15 सरपंच झाले बिनविरोध
*अजितदादांना हवी सोशल मीडियावर प्रसिद्धी, 6 कोटी करणार खर्च | सुपरफास्ट महाराष्ट्र | LokNews24
छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मनोंद असलेलं अप्रकाशित मोडीपत्र उजेडात l DAINIK LOKMNTHAN

अहमदनगर प्रतिनिधी –  संगमनेर फॅरिसट विभागातील संगमनेर विभागातील फॉरेस्ट अधिकाऱ्यांची मक्तेदारी बघायला मिळत आहे फॉरेस्ट रेंज अधिकारी  सागर माळी यांनी कुठलेही पूर्वकल्पना व कुठलेही प्रकारचा माहितीने देता त्यांच्या हद्दीतील चार कर्मचाऱ्यांना कामावर येण्यास मज्जाव केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.  संगमनेर तालुक्यात वन विभागात परिसरातील अधिकारी  सागर माळी साहेब व मंचरकर साहेब यांनी शासनाविरुद्ध ज्या ज्या कर्मचाऱ्यांनी कोर्टकचेरी चालू आहे अशा चार  कर्मचाऱ्यांना कामवर येण्यास मज्जा केला आहे. शिवाय त्यांच्या या वागणामुळे सर्वसामान्य कर्मचारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळत आहु याविषयी अधिक माहिती सांगताना कर्मचारी वर्गाने सांगितले की सागर माळी साहेबांनी आम्हाला तोंडी सांगितले की तुम्ही कामावर यायचे नाही तुम्ही शासनाविरुद्ध वनविभागाविरुद्ध कोर्टात गेला आहात कारण या कर्मचाऱ्यांनी कामावर कायमस्वरूपी शासकीय नियमानुसार आम्हाला कामावर घ्यावी यासाठी कोर्टात याचिका दाखल केली आहे संगमनेर मधील जवळजवळ वीस ते पंचवीस कर्मचाऱ्यांनी शासनाविरुद्ध कोर्टात याचिका दाखल केली असताना देखील केवळ चार कर्मचाऱ्यांना हीन वागणूक देत सागर माळी साहेब यांनी कामास येण्यास मजा केला आहे त्यामुळे अशा गोरगरीब सर्वसामान्य मोजूर कर्मचारी यांना महाराष्ट्र शासन व वन विभाग यांनी योग्य तो न्याय निवाडा करून कामावर घ्यावे हीच अपेक्षा.

COMMENTS