Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणतांब्यात शासन आपल्यादारी उपक्रम उत्साहात

पुणतांबा/प्रतिनिधी ः येथील  महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय राहता यांच्यामार्फत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या म

पाटबंधारे विभागाकडून उन्हाळी आवर्तन सोडण्याची तयारी सुरू
श्रीरामपूर रेल्वे स्टेशनचा अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेत समावेश
दरवाजा उघडता उघडता…पायाजवळची पर्स झाली गायब

पुणतांबा/प्रतिनिधी ः येथील  महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय राहता यांच्यामार्फत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शासन आपले दारी मोहीम आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉक्टर धनंजय धनवटे हे होते. यावेळी कृषी सहाय्यक राजेश प-हे यांनी शेतकर्‍यांना कृषी विभाग मार्फत राबविण्यात येणार्‍या मागेल त्याला शेततळे ,ठिबक व तुषार सिंचन, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री खाद्य उन्नयनयोजना व इतर लाभांच्या योजनांची सविस्तरपणे माहिती दिली. कृषी सहाय्यक किरण धुमाळ यांनी सोयाबीन बीज प्रक्रिया व सोयाबीन वाणांची माहिती व एकात्मिक खत व्यवस्थापन सोयाबीन पिकातील एकात्मिक कीड व रोग नियंत्रण याविषयी सविस्तरपणे मार्गदर्शन केले.

COMMENTS