Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 पंचवटीत ठिकठिकाणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा 

पंचवटी - नाशिक लोकसभा व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे निकाल हाती पडताच पंचवटीत ठिकठिकाणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आ

महिला स्वयंसहाय्यता गटातील महिलांचा जनजागृती अभियानात सहभाग
मारहाणप्रकरणातील सर्व 14 आरोपींना तुरुंगवास
 विनयभंगप्रकरणी आरोपीला एक वर्षाची शिक्षा 

पंचवटी – नाशिक लोकसभा व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे निकाल हाती पडताच पंचवटीत ठिकठिकाणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला या पंचवटी मालेगाव स्टॅन्ड, दिंडोरी रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंप, आडगाव , मखमलाबाद , नांदूर आदी भागात जल्लोष करण्यात आला.

नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या झालेल्या लढतीत महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे हे शिवसेना शिंदे गटाचे दोनदा खासदार राहिलेले हेमंत गोडसे यांना पराभूत करून मताधिक्याने निवडून आले. मतदार संघातील नाशिक इगतपुरी सिन्नर त्रंबकेश्वर आदी भागांमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष हा सुरूच होता.  पंचवटीतील ढोल पथक वाजवत प्रथम मालेगाव स्टँड वरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर  एकमेकांना पेढे भरवून अभिनंदन केले. गुलालाची उधळण करीत, ढोल पथक वाजवत जल्लोष साजरा करण्यात आला.यावेळी श्रमिक सेनेचे मामा राजवाडे,अजय बागुल,मनोज जाधव,  मनीष बागुल,  राहुल दराडे, महेंद्र बडवे, सुनील निरगुडे, शैलेश सूर्यवंशी, गुलाब भोये, आम आदमी पार्टीचे योगेश कापसे आदी सह महीला पदाधिकारी,  कार्यकर्त्या तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

आडगावात शिवारात कार्यकर्त्यांकडून जल्लोष – आडगावगाव व आडगाव फाटा, मेडिकल काॅलेज, जत्रा चौफुली नांदुर नाका, नांदूर रोड, मानूर येथे फटाके फोडून, ढोलताशा वाजत जल्लोष साजरा करण्यात आला,शिवसेना उपमहानगर प्रमुख सुनील जाधव, बालाजी माळोदे,विभाग प्रमुख पोपट शिंदे, अतुल मते,विभाग संघटक  संदीप पोटे, संजय माळोदे, शांताराम माळोदे, अमोल गांगुर्डे, सुनील गांगुर्डे, दशरथ निमसे, दशरथ दिंडे, सचिन देशमुख, महेश मते  नवनाथ माळोदे,  शरद लभडे, संतोष गांगुर्डे,समाधान खांदवे, जयेश माने, सचिन मते, मंगेश लभडे, अंबादास नवले, प्रकाश मते, बबलू मते, अनिल मते, सुनील मते,विकी जाधव, विठ्ठल कदम, भोळे मामा, गोटू शिंदे, मोबीन सय्यद, अल्ताफ सय्यद, गुलाम सय्यद, आदी सह शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादीचे काँग्रेस शरद पवार गटचे पंचवटी कार्याध्यक्षा संतोष जगताप देखील उपस्थित होते.

दिंडोरी रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंप येथे जल्लोष – फटाक्यांची आतषबाजी केली,गुलाल उधळत ढोल ताशा पथक लावून नाचून जालोष साजरा केला.यावेळी म्हसरूळ शिवारातील शिवसेनेत पूर्व विधानसभा मतदारसंघ संघटक विशाल कदम, बाबा म्हस्के, सविता म्हस्के, सचिन बनकर,बाळासाहेब राऊत, गणेश जगताप, पिंटू गावडे, संतोष कोराळे , राहुल सानप, सचिन भुजबळ महीला  यांच्या सह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

एका छायाचित्रात मालेगाव स्टँड येथे जल्लोष करताना श्रमिक सेनेचे मामा राजवाडे,अजय बागुल, मनीष बागुल मनोज जाधव, राहुल दराडे, महेंद्र बडवे,गुलाब भोये,आमं आदमी  पार्टीचे योगेश कापसे, आदी सह महीला कार्यकर्त्या, दुसऱ्या छायाचित्रात आडगाव येथे जल्लोष साजरा करताना शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट पदाधिकारी व कार्यकर्ते तिसऱ्या छायाचित्रात दिंडी रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंप येथे जल्लोष करीत नाचून आनंद साजरा करताना शिवसेना उबाठा गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते

COMMENTS