Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निसर्गाचा प्रकोपापेक्षा व्यसनमुक्तरहाणे आपल्या हातात : हभप बंडातात्या कर्‍हाडकर

वाहिटे : जावळी तालुक्यातील वाहिटे येथील पूर्ववत केलेल्या विहिरींची पाहणी करताना हभप बंडातात्या कर्‍हाडकर व शेतकरी. कुडाळ / वार्ताहर : निसर्गाच्य

पाणीदार वरूडची महती देशभरात पसरेल : इंद्रजीत देशमुख
अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल
बिबी धरणाचे काम सुरू; शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण

कुडाळ / वार्ताहर : निसर्गाच्या हातातील काही गोष्टी या माणसाच्या हातात नसतात. यामुळे त्यांना थांबविणे शक्य होत नाही. आपण निसर्गाचा प्रकोप थांबवू शकत नाही पण माणसांच्या जीवनात व्यसनाधिनतेचा वाढणारा प्रकोप थांबविणे आपल्या हातात आहे. याला प्रतिबंध करणे हीच काळाची गरज आहे, असे प्रतिपादन हभप बंडातात्या कर्‍हाडकर यांनी केले.
बंडातात्या कर्‍हाडकर म्हणाले, आजही समाजात चांगूलपणा जिवंत आहे. संकट काळात लोक एकमेकांना मदत करत आहेत म्हणूनच व्यसनमुक्त युवक संघाला अतिवृष्टीग्रस्तांना 32 टन धान्य व 7 लाख रूपयांची जीवनावश्यक किट देता आली. आम्ही फक्त पोष्टमनची भूमिका बजावली आहे. विहीरी काढण्यासाठी आमचे कार्यकर्ते कल्याण तावरे बारामती यांनी फॉकलेन मशिन दिले तर डिझेलची मदत कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी केल्याने विहीरी काढण्याचे काम वेगात पूर्ण करता आले. यापुढे समाजाचे दुःख हलके करण्यासाठी आपल्या गावच्या शक्ती देवतेने व्यसनमुक्त संघाला शक्ती द्यावी, अशी प्रार्थनाही केली.
गतवर्षी अतिवृष्टीमुळे केळघर भागातील शेतकर्‍यांच्या शेती व विहीरींचे अतोनात नुकसान झाले होते. यापैकी वाहिटे गावातील शेतकर्‍यांना त्यांच्या विहीरी पूर्ववत करून देण्याचा शब्द कर्‍हाडकर यांनी दिला होता. यानुसार वाहिटे गावातील 9 विहीरी पुर्ववत करून देण्याचे काम व्यसनमुक्त युवक संघाने पूर्ण केले आहे. वाहिटे गावचे सरपंच राजाराम जांभळे यांनी व्यसनमुक्त युवक संघाने केलेली मदत आम्ही ग्रामस्थ कधीही विसरू शकत नाही. आता उन्हाळी पिके घेतल्याने शेतकर्‍यांना नक्कीच फायदा होणार आहे. हे काम किमान 40 लाखाने झाले नसते, अशी भावना व्यक्त केली.

COMMENTS