Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागपूरमध्ये तापमानाचा पारा पोहोचला 56 अंशांवर

नागपूर ः राजधानी दिल्लीमध्ये 52.3 अंश तापमान नोंदवल्यानंतर तापमान वाढ रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या चर्चा सुरू झाल्या असतांना नागपुरात तापमाना

Hingoli : धक्कादायक…या गावच्या ग्रामसेवकाचा अपघातात मृत्यू (Video)
रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून हिरवा झेंडा
दैव बलवत्तर म्हणून बिबट्यापासून वाचला जीव

नागपूर ः राजधानी दिल्लीमध्ये 52.3 अंश तापमान नोंदवल्यानंतर तापमान वाढ रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या चर्चा सुरू झाल्या असतांना नागपुरात तापमानाचा पारा 56 अंशांवर पोहोचल्याचे समोर आले आहे. मान्सून केरळपर्यंत आला लवकरच संपूर्ण भारतात येणार अशी चर्चा चालू असली तरी तापमानाचा पारा कमी होण्याचे नाव घेत नाही. उष्णतेच्या झळा जीव कातावून टाकत आहेत. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरला याचा सर्वात मोठा फटका बसला आहे. नागपूरची अक्षरश: भट्टी झाली आहे. तिथे गुरुवारी तब्बल 56 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
देशाची राजधानी दिल्लीतील मंगेशपुरी भागात दोन दिवसांपूर्वी 52.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. हा देशभरातील तापमानाचा उच्चांक होता. त्यामुळे दिल्लीत भीतीचे वातावरण होते. मात्र, आता नागपूरने दिल्लीलाही मागे टाकले आहे. इथल्या तापमानात अनपेक्षित वाढ झाली आहे. उष्णतेमुळे लोक हैराण झाले असून, एवढी उष्णता का व कशी होत आहे, हेच कळेनासे झाले आहे.

हवामान विभागाने देखील वाढत्या उष्णतेबाबत चिंता व्यक्त केली आहे. दिल्लीतील तापमान 52.9 अंशांवर पोहोचल्यावर हवामान विभागाने तपासाचे आदेश दिले होते. आता नागपुरातही तापमान मोजताना काही चूक झाली का, याची चौकशी सुरू आहे. हवामान विभागाने नागपुरात स्थापन केलेल्या चार स्वयंचलित हवामान केंद्रांपैकी दोन केंद्रांनी 50 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान दाखवले आहे. हे तापमान दिल्लीतील विक्रमी तापमानापेक्षाही जास्त आहे. नागपूरच्या उत्तर अंबाझरी रोडपासून दूर असलेल्या रामदासपेठ येथे पीडीकेव्हीच्या 24 हेक्टर खुल्या कृषी क्षेत्राच्या मध्यभागी स्थापित नागपूर एडब्ल्यूएसमध्ये 56 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. याशिवाय सोनेगावच्या प्रादेशिक हवामान केंद्रात 54 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वर्धा रोडवरील खापरी येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या शेतात असलेल्या तिसर्‍या हवामान केंद्रात 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर रामटेक येथे 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गेल्या दोन आठवड्यांपासून मध्य भारत, उत्तर भारत आणि पूर्व भारतात तीव्र उष्णता आहे. ’रेमल’ चक्रीवादळाचे आगमन आणि केरळमध्ये मान्सूनचं नियोजित वेळेच्या तीन दिवस आधी आगमन झाल्यानंतर हवामान विभागाने आता तापमानात हळूहळू घट होईल आणि मान्सून पुढे सरकल्याने लोकांना दिलासा मिळेल, असे हवामान विभागानंच म्हटले होते. मात्र, नागपुरातील वाढत्या पार्‍यामुळं स्थानिक लोक अस्वस्थ झाले आहेत. तथापि, काल दिल्लीचे कमाल तापमान 45 अंशांच्या आसपास नोंदवले गेले. हा आकडा हवामान विभागाच्या अंदाजाशी मिळताजुळता आहे.

राज्यात उष्णतासदृश्य लाट – राज्यामध्ये उष्णतासदृश लाट खान्देश, मराठवाड्यात राहणार असून, खान्देशात रात्रीचा उकाडाही वाढेल, असा इशारा ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिला आहे. खान्देश आणि मराठवाड्यातील 11 जिल्ह्यांत उष्णतासदृश लाट टिकून असेल. तर खान्देशात रात्रीचा उकाडाही या दोन दिवसांत जाणवेल, असेही त्यांनी सांगितले.

COMMENTS