कोल्हापूर / प्रतिनिधी : कोरोनाची तिसरी लाट आली तर त्याचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. पहिल्या व दुसर्या लाटेचा अभ्यास करून सं
कोल्हापूर / प्रतिनिधी : कोरोनाची तिसरी लाट आली तर त्याचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. पहिल्या व दुसर्या लाटेचा अभ्यास करून संभाव्य तिसर्या लाटेची तयारी करण्यात आली आहे. या लाटेत दुसर्या लाटेच्या दीडपट संख्येने लोक बाधित होतील, असा अंदाज आहे. दुसर्या लाटेत 3 मे 2021 मध्ये जास्तीत जास्त अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 16 हजार 299 इतकी होती. तिसर्या लाटेत ही रुग्णसंख्या दीडपटीने वाढून ती जास्तीत जास्त 24 हजार 449 इतकी होईल, असा अंदाज आहे. ही रुग्णसंख्या गृहीत धरून पुढील नियोजन सुरू आहे.
कोरोनाच्या संभाव्य तिसर्या लाटेचे नियोजन करण्यात येत आहे. गुरुवारी ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण सापडल्याने निर्बंध अधिकाधिक कडक करण्याचे धोरण जिल्हा प्रशासनाने घेतले आहे. ओमिक्रॉनमुळे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी अत्यंत कमी असल्याने, भराभर रुग्णवाढीचे संकेत मिळत आहेत. मागील दोन कोरोना लाटांचा अभ्यास करून आरोग्य विभागाने संभाव्य तिसरी लाट कशी असेल, त्यासाठी काय उपाययोजना केल्या जातील, याचा आराखडा तयार केला आहे. दुसर्या लाटेत दहा दिवसांतील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ही 16 हजार 299 इतकी होती. तर तिसर्या लाटेत ही रुग्णसंख्या 24 हजार 499 इतकी होईल, असा अंदाज आहे. या रुग्णांपैकी 65 टक्के रुग्णांना घरातच विलगीकरणात ठेवले जाणार आहे.
35 टक्के लोकांवर रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत. रुग्णालयात दाखल होणार्या रुग्णांमधील किती रुग्णांना ऑक्सिजन बेड, तसेच व्हेंटिलेटर लागेल, याचा अंदाज बांधण्यात आला आहे. आरोग्य विभागाने गृहीत धरलेल्या अंदाजानुसार रुग्णसंख्या राहिली. आरोग्य विभागाने केलेली तयारी पुरेशी राहणार आहे. कारण बेड, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटरची संख्या ही अपेक्षित बाधित रुग्णांच्या तुलनेत बरीच आहे. मात्र, रुग्ण संख्या कमी राहणार की जास्त, हे पूर्णपणे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून राहणार आहे. मागील दोन लाटांच्या तुलनेत यावेळी लसीकरण मोठ्या प्रमाणात वाढल्याने काही प्रमाणात या लाटेचा प्रभाव कमी राहील, असा अंदाज आरोग्य विभागाकडून वर्तवण्यात येत आहे.
कोविड रुग्णांच्या उपचारासाठी मूलभूत सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. मात्र, ही लाट येऊ नये, यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. मागील दोन लाटांमध्ये 10 दिवसांतील सर्वाधिक बाधित रुग्णसंख्या अपेक्षित होती. तेवढी रुग्ण संख्या आढळली नाही. यावेळीही वेगळे चित्र असणार नाही. मागील दोन लाटांमध्ये जिल्ह्यात बाहेरून येणार्या रुग्णांची संख्या वाढल्याने व्हेंटिलेटर उपलब्ध झाले नाहीत. मात्र, ऑक्सिजनसह इतर बेड अपेक्षेपेक्षा जास्त उपलब्ध आहेत.
डॉ. योगेश साळे (जिल्हा आरोग्य अधिकारी)
COMMENTS